मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिशय वेगवान, दर्जेदार आणि विश्वासार्ह वृत्त देणाऱ्या ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ वेब न्यूजच्या बातम्यांना ‘डेली हंट’ या न्यूज अॅपवर अवघ्या पंधरा महिन्यात ३ कोटी ५० लाख दर्शकांनी पसंती दिली आहे. तर दोन वर्षात इंडिया दर्पण लाईव्ह वेबपोर्टलने तब्बल २ कोटी ५ लाख अधिक दर्शकांचा (व्ह्यूज) टप्पा पार केला आहे. त्यामुळे पोर्टल आणि डेलीहंट अॅप मिळून तब्बल ५ कोटी ५५ लाख दर्शकांची संख्या ‘इंडिया दर्पण’ने ओलांडली आहे. अशा प्रकारचे यश मिळविणाऱ्या अत्यंत मोजक्या न्यूज पोर्टलमध्ये ‘इंडिया दर्पण लाईव्ह’चा समावेश झाला आहे.
गतिमान वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण मिडिया हाऊस’ या मिडिया स्टार्टअपचा शुभारंभ कोरोनाच्या काळात १ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात आला. याच माध्यमातून वेब न्यूज पोर्टल, साप्ताहिक, यू ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्विटर अकाऊंट, व्हॉटसअॅप या माध्यमातून वृत्तसेवा सुरू करण्यात आली. अतिशय दर्जेदार, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांमुळे ‘इंडिया दर्पण’ची लोकप्रियता अल्पावधीतच मोठे शिखर गाठणारी ठरली. त्यामुळेच ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ने अवघ्या पंधरा महिन्यात डेली हंटवर ३ कोटी ५० लाख दर्शकांनी पसंती दिली. तर दोन वर्षात ‘इंडिया दर्पण लाईव्ह’वर तब्बल २ कोटी ५ लाख अधिक दर्शकांचा (व्ह्यूज) टप्पा पार केला.
अत्यंत आव्हानात्मक असलेल्या कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या सोशल मिडिया वृत्तसेवांमध्ये ‘इंडिया दर्पण’ने मैलाचा दगड गाठला आहे. विशेष म्हणजे या सर्वांची दखल देशभर प्रसिद्ध असलेल्या ‘डेली हंट’ या न्यूज अॅपने पंधरा महिन्यापूर्वी घेतली. आज या अॅपवरही ‘इंडिया दर्पण’चे २३ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. या अॅपवर होणारी दर्शकांची संख्या वेगळी कांऊट केली जात असून येथे ‘इंडिया दर्पण’ला ३ कोटी ५० लाख व्हूज मिळाले आहे. जगभर मराठी वाचक क्षणाक्षणाला या अॅपमुळे बातम्या वाचत आहेत. ‘इंडिया दर्पण’चे संपादक गौतम संचेती, कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर, साहित्य व संस्कृती क्षेत्राचे संपादक देविदास चौधरी यांनी वाचकांच्या या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.
इंडिया दर्पण लाईव्ह न्यूज पोर्टलची घोडदौड
व्हॉटसअॅप – १६० हून अधिक ग्रुप. त्यात ५० हजाराहून अधिक सदस्य
इंडिया दर्पण लाईव्ह वेबसाईट – २ कोटी ५ लाख (व्ह्यूज)
डेली हंट – ३ कोटी ५० लाख (व्ह्यूज)
वेब पोर्टल व डेली हंट – ५ कोटी ५५ (व्ह्यूज)
डेली हंट – २३ हजाराहून अधिक सबस्क्रायबर्स
इंडिया दर्पण लाईव्ह फेसबुक पेज – २४ हजार ४३८ फॉलोअर्स
यूट्यूब चॅनल – २ हजाराहून अधिक सबस्क्रायबर्स आणि तब्बल ७ लाख २ हजाराहून अधिक व्ह्यूज
ट्विटर – बातम्यांचे सातत्याने अपडेटस
दिवसाकाठी – प्रत्येक बातमी तब्बल दीड लाखाहून अधिक वाचकांपर्यंत पोहचते
(आकडेवारी ११ ऑगस्ट २०२२ पर्यंत)
India Darpan Live News Web Portal Set Record