इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, म्हणजेच CBDT ने ITR-1 ते ITR-7 पर्यंतचे सर्व फॉर्म अधिसूचित केले आहेत, परंतु यासाठी आवश्यक असलेले ऑनलाइन टूल्स जसे की JSON, Excel आणि ऑनलाइन ई-फायलिंग युटिलिटीज अद्याप पोर्टलवर उपलब्ध नाहीत. तसेच फॉर्ममध्ये केलेले बदल, बॅकएंड तंत्रज्ञान अपग्रेड आणि डेटा इंटिग्रेशन (जसे की AIS आणि TIS सह) यामुळे विलंब होत असल्या कारणाने आयटीआर दाखल करण्यास अडचणी येत असल्याने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, म्हणजेच CBDT ने स्वतः पुढारकर घेत आयटीआर (ITR) दाखल करण्यासाठी मुदत वाढ दिलेली असून करदात्यानॆ आता १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर (ITR) दाखल करता येणार आहे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या प्रत्यक्ष कर महसूल मंडळाने प्रेस प्रकाशनाद्वारे जाहीर केले आहे.