नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक वर्ष २०२१-२२ चे आयकर विवरण पत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२२ ही आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ चे ज्यांचे आयकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) अद्याप भरलेले नाही त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून आपले आयकर विवरणपत्र फाईल करू शकतात. त्यानंतर म्हणजेच १ जानेवारी २०२३ पासून आर्थिक वर्ष २०२१-२२ चे आयकर विवरणपत्र भरता येणार नाही.
नाशिक टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी माहिती दिली की, ३१ मार्च २०२२ चे ज्यांनी आयकर विवरणपत्र अद्याप भरलेली नाहीत त्यांच्याकरिता ३१ डिसेंबर २०२२ ही शेवटची मुदत आ.हे यानंतर त्या आर्थिक वर्षाचे रिटर्न भरता येणार नाही. याचबरोबर आपण रिटर्न भरलेले आहे परंतु त्यात काही चुका झालेल्या असतील आणि आपल्याला रिटर्न रिवाईज करायचे असेल तर त्यासाठी देखील ३१ डिसेंबर २०२२ ही शेवटची तारीख आहे.
भरावा लागेल एवढा दंड
आयकर कायद्यानुसार दंड भरून ३१ डिसेंबर २०२२ च्या आत आपले रिटर्न फाईल करून घ्यावीत. जर आपले एकूण उत्पन्न रु. २ लाख ५० हजार किंवा त्याच्या आत असेल तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा दंड आकारला जाणार नाही. जर उत्पन्न रू.५ लाखापेक्षा कमी असेल तर आपल्याला एक हजार रुपये दंड लागेल व ५ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर पाच हजार रुपये दंड लागेल.
आयकर विवरणपत्र हे निर्धारित तारखेतच भरले गेले पाहिजे. परंतु काही कारणास्तव आपण ते भरू शकला नाही तर त्याकरिता आपल्याला एक शेवटची संधी आहे. त्यामुळे आपण ३१ डिसेंबर २०२२ च्या आत रिटर्न दाखल करा.अधिक माहितीसाठी आपण आपल्या कर सल्लागाराशी संपर्क साधावा असे आव्हान टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशन, नाशिकच्या वतीने करण्यात आले आहे.
Income Tax Return Deadline 31 December 2022