India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बुलढाण्यात बारावीचा पेपर असा फुटला; दोन शिक्षकांसह ५ जणांना अटक, पोलिसांनी लावला छडा

India Darpan by India Darpan
March 5, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बुलढाण्यात इयत्ता बारावीचा पेपर नेमका कसा फुटला याचा छडा पोलिसांनी लावला आहे. व्हॉटसअॅप ग्रुप बनवून हा पेपर फोडण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी २ शिक्षकांसह ५ जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. परीक्षेत पास करुन देण्यासाठी आणि कॉपी पुरविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून १० ते १२ हजार रुपये घेतल्याची बाबही समोर आली आहे.

सामूहिक कॉपी प्रकरणात नऊ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर गणिताचा पेपर फुटल्याची घटना घडली. बुलढाण्यात पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात गणिताचा पेपर फुटला आणि काही क्षणात तो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

राज्य शासनाच्या कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासणाऱ्या घटना महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत. यात अनेक प्रकरणांमध्ये तर शिक्षक स्वतःच सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. सिंदखेडराजा येथील एका परीक्षा केंद्रावर बारावीचा गणिताचा पेपर सुरू झाला आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर तो सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सारेच बुचकाळ्यात पडले. या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून सरकारी यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई होईल, अशी माहिती अमरावती शिक्षण मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी दिली आहे. घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून वेगाने तपास सुरू झाला आहे, असेही ते म्हणाले.

ग्रुप बनवला
व्हॉटसअॅप ग्रुपद्वारे पेपर लीक करण्यात आला. या ग्रुपमध्ये एकूण ९९ जण होते, असे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक या ग्रुपमध्ये होते. पेपर फुटीची घटना समोर आल्यानंतर हा ग्रुप डिलीट करण्या आला.

पुण्यातूनही आदेश
पेपरफुटी प्रकरणात तपास करून तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश पुण्यातील शिक्षण मंडळाकडूनही देण्यात आले आहेत. बुलढाण्याचे गट शिक्षणाधिकारी गावडे यांनी गणिताचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे एवढे प्रकरण होऊनही कोणत्या केंद्रावरून पेपर फुटला, हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

शिक्षकच कॉपी करतात तेव्हा
परभणी येथील घटना असो वा दौंडची घटना असो… शिक्षकच कॉपीसाठी मदत करतात तेव्हा शिक्षण क्षेत्राचं काय होणार, अशी चिंता व्यक्त होत आहे. परभणी येथे सहा शिक्षक शाळेच्या मागे बसून पेपर सोडवत होते तर दौंड येथे शिक्षकांच्या देखरेतील अख्ख्या केंद्रावरील विद्यार्थी कॉपी करत होते.

विधानसभेत मुद्दा
विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कॉपीचे व पेपरफुटीचे प्रकरण सभागृहात चर्चेला आणले. सिंदखेडराजाच्या घटनेवरून त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

HSC Board Exam Paper Leak Crime 5 Arrested


Previous Post

तीन वर्षांनी रंगला एसएमबीटी फेस्ट… प्रसिद्ध लाइफ कोच गौर गोपालदास म्हणाले…

Next Post

स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री चौहान यांनी सुरू केली ही अभिनव योजना; दरमहा मिळणार १ हजार रुपये (Video)

Next Post

स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री चौहान यांनी सुरू केली ही अभिनव योजना; दरमहा मिळणार १ हजार रुपये (Video)

ताज्या बातम्या

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्टातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group