पुणे – पूर्वीच्या काळी प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी धर्म आणि विज्ञान ग्रंथांचा किंवा जाणकार व्यक्तींचा आधार घेतला जात असे. कालांतराने विश्वकोश आणि अन्य संदर्भ ग्रंथांची निर्मिती झाली. आता मात्र अत्याधुनिक युगात ‘गुगल बाबा’ अवतरला आहे. आपल्याला कोणताही प्रश्न पडला की, तात्काळ गुगल सर्च केले जाते. आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा गुगल एक भाग बनला आहे.
काही शोधायचे असेल तर आपण गुगलवर कोणत्याही भाषेत काहीही बोलून, टाइप करून शोधू शकता. ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काही सेकंदात देते. पण गुगल कसे काम करते हे तुम्हाला माहीत आहे का? शेवटी, त्याला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कोठे मिळते? प्रश्न उद्भवतो की गुगल तुमच्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच देतो की, उत्तर देण्यासाठी कुठेतरी कॉपी-पेस्ट केले आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण गुगलच्या कार्य प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ या…
क्रॉलिंग
गुगल सर्चची पहिली पायरी म्हणजे क्रॉलिंग आहे. गुगल सतत पेज (पृष्ठे ) क्रॉल करते. तसेच त्याच्या अनुक्रमणिकेत नवीन पृष्ठे जोडत राहते. या प्रक्रियेलाच क्रॉलिंग म्हणतात. यासाठी, एक वेब क्रॉलर्स सॉफ्टवेअर आहे, तेथे क्रॉलर्सना वेब पेजेस सापडतात. ही वेब पृष्ठे शोधून, क्रॉलर्स त्यांच्यावरील लिंक फॉलो करतात. क्रॉलर्स लिंकवर जाऊन डेटा गोळा करतात आणि त्यांना गुगलच्या सर्व्हरवर आणतात. या प्रक्रियेद्वारे, गुगल इंडेक्सवर नवीन माहिती साठवली जाते.
अनुक्रमणिका
क्रॉलर्सना वेबपृष्ठ सापडते, तेव्हा गुगल त्या पृष्ठाची सामग्री तपासते. पृष्ठ सामग्री व्यतिरिक्त, त्यात प्रतिमा आणि व्हिडिओ देखील समाविष्ट आहेत. क्रॉल केलेले पेज गुगल पाहते. गुगल तेथे योग्य URL, कीवर्ड आणि अन्य साहित्य तपासते. तसेच नवीनतम पान ओळखले जाते. अशाप्रकारे गुगल शोध अनुक्रमणिकेत उपस्थित असलेल्या सर्व माहितीचा मागोवा घेते. तसेच गुगल कॉपी-पेस्ट केलेला आशय काढून टाकतो. ही सर्व माहिती गुगल इंडेक्समध्ये साठवली जाते आणि त्याबद्दल मोठा डेटाबेस तयार केला जातो.
व्हिडिओचा वापर
गुगल वापरकर्त्यांनी नेहमी गुगल सर्चसाठी संपूर्ण अर्थपूर्ण शब्द किंवा माहिती टाकावी लागते, म्हणजे ज्यांचे हेडलाइन, यूआरएल आणि कीवर्ड्स त्याच्याशी नक्की जुळतात. तसेच शीर्षक लहान असावे. माहिती स्पष्ट करण्यासाठी प्रतिमा आणि मजकूर वापरावा. त्याचबरोबर, सध्याच्या युगातील कोणत्याही बाबीचें स्पष्टीकरण देण्यासाठी व्हिडिओचा वापर केला जातो. ते देखील गुगल वर मिळू शकतात.