इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हटले जाते की, तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर घराबाहेर पडावे लागते, पण कोरोना काळात आणि त्या काळानंतर तर घरबसल्या काम करून पैसे मिळवणे सहज शक्य झाले आहे त्यासाठी चांगल्या मार्गाचा अवलंब करता येतो
पैसे कमवण्यासाठी आता तुमच्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या खूप पैसा कमवू शकता. एक चांगला प्रोग्रामर, छायाचित्रकार, कन्टेन्ट लेखक, व्हिडिओ संपादक किंवा इतर कोणत्याही प्रकारची कार्य करण्याची क्षमता आपल्याकडे असल्यास आपण फ्रीलान्सिंग वर्कमधून ऑनलाइन पैसे कमविण्यासाठी वापरु शकता.
फ्रीलान्सिंग म्हणजे लोक आपल्याला ऑनलाइन काम देतात आणि जेव्हा ते काम करतात तेव्हा त्या बदल्यात आपल्याला पैसे देतात. बर्याच मोठ्या वेबसाइट्स आहेत ज्यात त्यांची Content इतर लेखकांनी लिहिले आहे आणि त्या बदल्यात त्यांना प्रति वर्ड किंवा फिक्स रेटच्या हिशोबाने पैसे दिले जातात, याला Content writing म्हणतात. यासाठी आपण बर्याच वेबसाइटवर आपल्या ऑनलाइन ग्राहकांचा शोध घेऊ शकता, जसे की, online म्हणजेच, जर आपण भारतीय मराठी किंवा हिंदी वेबसाइटसाठी चांगल्या प्रतीची सामग्री लिहू शकता आणि आपली टाइपिंग स्पीड देखील चांगली असेल तर आपण दररोज सुमारे ₹ 1000 ते 3000 मिळवू शकता.
येथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले लेखन कौशल्य चांगले असावे आणि आपण क्लायंटकडे यावे ज्यासाठी आपण या साइट वापरू शकता. स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनले आहे. स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. हे स्मार्टफोन्स तुम्हाला पैसे मिळविण्यात देखील मदत करू शकतात. यासाठी तुम्हाला काही सोप्प्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. ज्यांच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनद्वारे घरी बसून पैसे मिळवू शकता. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही Google Opinion Rewards ची मदत घेऊ शकता. उत्पन्नासाठी तुम्ही गुगलच्या ओपिनियन रिवॉर्ड्सची मदत घेऊ शकता. ओपिनियन रिवॉर्डवर, तुम्हाला केवळ एका मुद्द्यावर तुमचे मत व्यक्त करायचे आहे. यासाठी तुम्हाला पैसे मिळतील. गूगल कंपनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सर्वेक्षण करत असते . तुम्हाला फक्त या सर्वेक्षणाची अचूक उत्तरे द्यायची आहेत.
रोजच्या धावपळीच्या जीवनापासून थोडं दूर होऊन घरी बसून काम करणं कोणाला आवडणार नाही ? काही महिला अशा असतात, ज्यांना काम करण्याची इच्छा खूप असते, मात्र त्यांना ऑफीसला जाऊन काम करणे शक्य नसते. घरच्या अडचणींमुळे त्यांना ऑफीसला तर जाता येत नाही, पण त्यांना कामाची खूप आवड असते. अशावेळी त्या घरी राहूनच अशी काही कामे अथवा जॉब करू शकतात, त्यामुळे थोड्याफार प्रमाणात अर्थार्जनही होऊ शकेल. घरी राहून काम करण्याचा फायदा म्हणजे आपली वेळ सांभाळून काम करता येते, तसेच ऑफीसला जाण्या-येण्याचा वेळ आणि दगदग वाचते, ज्यामुळे जास्त उत्साहाने आणि लक्ष देऊन, एकाग्रतेने काम करता येते.
कोरोना काळापासून अनेक जण ऑफलाइन शाळांपेक्षा ऑनलाइन शिक्षण घेणे पसंत करत आहेत. त्यामुळे वेळ तर वाचतोच, पण कुठेही बाहेर जावे लागत नसल्याने संसर्गापासून बचावही होते. या काळात अनेक शाळा ऑनलाइन सुरू होत्या. ज्या महिलांना घरी राहून काम करण्याची इच्छा आहे, त्या ऑनलाइन क्लासेस किंवा शिकवणी घेऊ शकतात. किंवा मुलांना घरी बोलावूनही त्यांना शिकवू शकतात. त्यामध्ये कमाईही चांगली होते.
सध्या तरूणी अथवा महिलांना स्वयंपाक करणे, वेगवेगळे पदार्थ तयार करणे, रेसिपीज ट्राय करणे आवडते. तुम्हाला घरी राहून काम करायचे असेल तर तुम्ही खाद्यपदार्थ तयार करण्याचा एक छोटा उद्योग सुरू करू शकता. घरी राहून वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांच्या ऑर्डर्स घेऊ शकता, केटरिंगही करू शकता. टिफीन सर्व्हिस किंवा ऑनलाइन माध्यमातूनही तुम्ही तुमचे पदार्थ विकून पैसे कमवू शकता.
महिला किंवा तरुणी घरातच फिटनेस सेंटरही उघडू शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला व्यायामाचे, फिटनेसचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्ही त्या संदर्भातील एखादा कोर्स केला असेल तर या क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. घरच्या घरी महिलांकडून व्यायाम करून घेऊ शकता अथवा ऑनलाइन क्लासही घेऊ शकता. या क्षेत्रातही चांगली कमाई होऊ शकते.
अनेक महिलांना नृत्याची आवड असते. तुम्हालाही अशी आवड असल्यास तुम्ही मुलांसाठी किंवा मोठ्या व्यक्तींसाठीही डान्स क्लास घेऊ शकता. तुम्ही त्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले असेल तर आणखीनच उत्तम गोष्ट. घरी किंवा ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून तुम्ही मुलांना किंवा नृत्य शिकण्याची आवड असणाऱ्याना डान्स शिकवू शकता. त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा आहे तो इंटरनेट होय, फक्त इंटरनेटच्या मदतीने तुम्ही महिन्याला लाखभर रुपये कमवू शकता.
How to Earn Money From Home Tips Business Work