नाशिक – ८ मे २०२२ रोजी म्हणजे रविवारी नाशिकमध्ये रॅडिसन ब्लू हॉटेल ॲण्ड स्पा (Radison Blu Hotel & Spa), पाथर्डी फाटा, नाशिक यांच्यातर्फे खास ब्रंच (Brunch) शौकिनांसाठी नाशिकमधल्या आत्तापावेतोच्या सर्वाधिक लांबलचक अशा ब्रंच मेजवानीचे खास आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जगातल्या विविध अशा जवळपास ७० खाद्यपदार्थांचा समावेश असणार असल्याची माहिती रेडिसन ब्लू हॉटेलचे व्यवस्थापक जुलियन लॉइड आणि मार्केटिंग मॅनेजर इशिता कानिटकर यांनी इंडिया दर्पणशी बोलतांना दिली. या मेजवानीत खासकरुन बिटरूट चॅाप्स, पोलेन्टा स्टेक, सिलीशिअन कॅपोनेटा, फटौश, हमस याखेरीज लाईव्ह काऊंटर मध्ये ठेचा, आमरस, लातूर चिकण बिर्याणी, मँगो टोफू,थाई करी आणि जस्मिन राईस यासारख्या अनेक चविष्ट पदार्थांचा समावेश असणार आहे.
दुपारी १२ ते ४ या वेळेतल्या मेजवानीचा दर प्रति व्यक्ती रू.१३५०/- इतका असणार आहे
काय असतो ब्रंच ?
हल्ली ‘फुडी’ लोकांसमोर ब्रंच (Brunch) हा शब्द जरी उच्चारला, तर ते आनंदाने उड्या मारतील. खास करुन नव्या पिढीचा आवडता विषय म्हणजे ब्रंच. काय असतं हे? या शब्दाचा अगदी डिक्शनरी अर्थ शोधायचा झाला तर तो असा आहे की ‘सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण, याऐवजी उशिरा केलेलं सकाळचं जेवण म्हणजे ब्रंच’. हा अर्थ समजायला जरा जास्तच अवघड वाटत असेल तर यातला अगदी सोप्पा अर्थ असा आहे की सकाळच्या नाष्त्यासाठी आपण कधीकधी जे काही वेगवेगळे चमचमीत खातो ते पदार्थ आणि दुपारच्या जेवणात जो काही मुख्य मेनू म्हणून खातो त्याचेच कॉम्बिनेशन असलेल्या मेजवानीला ब्रंच असे म्हणायला हरकत नाही.