साप्ताहिक राशिभविष्य – 24 ते 31 जुलै 2022
मेष – या सप्ताहात प्रामुख्याने गतकाळात झालेल्या आर्थिक व्यवहाराचे सिंहावलोकन करावी लागेल. पुढील आर्थिक व्यवहारात भूतकालीन चुका होऊ नये याची काळजी घेण्यासाठी हे आवश्यक आहे……
वृषभ – या सप्ताहात छोटी छोटी दुखणी डोकं वर काढण्याची शक्यता आहे, अशावेळी कोणतेही दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तात्पुरते उपाय टाळावे…..
मिथुन – काही आर्थिक निर्णय या सप्ताहात अकस्मिकरित्या घ्यावे लागू शकतात. छोटे आर्थिक निर्णय त्वरित घेतले तरी चालतील. परंतु मोठे आर्थिक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये……
कर्क – कौटुंबिक वादाचे पर्यावसान या सप्ताहात मोठे स्वरूप घेऊ नये, त्याचप्रमाणे कौटुंबिक वादास मोठे स्वरूप येऊ नये, याची आपणास काळजी घ्यावी लागेल. शब्दाने शब्द वाढवू नये असे पहा….
सिंह – आर्थिक अंदाज अंशतः किंवा पूर्णतः चुकणे असं अनुभव या सप्ताहात येऊ शकतो. त्यामुळे निराश न होता अधिक अभ्यासपूर्ण पद्धतीने भविष्यकालीन योजनांवर काम सुरू ठेवा….
कन्या – कायदेशीर स्वरूपाची कामे या सप्ताहात अधिक प्रमाणात करावी लागू शकतात. ही सर्व कामे वेळेवर करा. दिरंगाईमुळे त्या संबंधात गुंतागुंत वाढू नये, याची काळजी घ्या….
तूळ – सामाजिक संबंध तसेच नातेवाईकांमधील नातेसंबंध मित्र कंपनी हे सर्व संबंध जपताना या सप्ताहात तारेवरची कसरत होऊ शकते. कुणाचाही गैरसमज होऊन संबंध कायमचे दुरावू नये असे पहा…..
वृश्चिक – इतरांना मदत करण्याचा, त्यांच्या अडचणीत सहकार्य करण्याचा आपला उद्देश जरूर चांगला असला तरी या सप्ताहात अशा प्रकारची मदत जरा जपूनच करावी. खऱ्या गरजूला करावी…..
धनु – पित्त प्रकृतीच्या लोकांनी या सप्ताहात विशेष काळजी घ्यावी. पित्ताचा त्रास बळावणार नाही, असा आहार घ्यावा. मुख्यतः रात्री ही काळजी घ्यावी. डोकेदुखी सांभाळावी……
मकर – विचारपूर्वक कामे न केल्यास या सप्ताहात एक काम अनेक वेळा करावे लागू शकते किंवा त्या कामासाठी बरेच हेलपाटे घालावे लागू शकतात, असे होणार नाही याची काळजी घ्यावी….
कुंभ – या सप्ताहात आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांमुळे मनस्ताप होणे, राग राग, चिडचिड होणे संभव आहे. अशावेळी स्वतःची तब्येत सांभाळून फार त्रास करून घेऊ नये…..
मीन – या सप्ताहात दूरचा प्रवास संभव आहे. प्रकृतीविषयक विशेष काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे वाहन विषयक काळजी घ्यावी. निष्कारण साहस टाळावे…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत 9373913484)