साप्ताहिक राशिभविष्य – 12 ते 19 डिसेंबर
मेष – हार्ड रिएक्शन टाळावी. वृत्तपत्रांवर नजर ठेवा. मनासारखी व्यवसायिक घडामोड होईल. आपल्या सूचनांचे कौतुक होईल…
वृषभ – नवीन व्यावसायिक संधी मिळेल. व्यवसाय बैठक बदला. मध्यम मुदतीची गुंतवणूक फायद्याची. वास्तुविषयक व्यवहाराबाबत वेट अँड वॉच….
मिथुन – मनासारखा मेनू चाखाल. मोठे आर्थिक निर्णय चर्चेनंतर घ्यावे. ज्येष्ठांचा सल्ला लक्षपूर्वक मानावा. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. परिश्रमाला पर्याय नाही.
कर्क – आर्थिक प्राप्तीसाठी बहुपर्यायीचा विचार करा. व्यावसायिक स्पर्धा जाणवेल. जागेचा प्रश्न भेडसावू शकतो. खानपान याची काळजी घ्या…
सिंह – फलदायी सप्ताह. तब्येतीची काळजी घ्या. भागीदारी व्यवसाय सांभाळा. जुने आप्तस्वकीय भेटतील. जुना गुंतवणुकीचा फायदा मिळेल….
कन्या – व्यवसायिक समस्या मिटतील. तब्येतीकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक समस्या निराकरण होईल. सहकाऱ्यांशी सौहार्द वातावरण ठेवा. कर्ज प्रकरण सांभाळा…..

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – रेंगाळलेले शुभकार्य ठरेल. सामाजिक क्षेत्रात वलयांकित वातावरण राहील. मोठी खरेदी होईल. कोणताही वाद विकोपाला जाऊ देऊ नये….. ॉ
वृश्चिक – कागदपत्रे व वस्तू सांभाळा. नवीन परिचय असलेल्या व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार नको. दीर्घकालीन आर्थिक व्यवहार फायद्याचे……
धनु – ध्यानधारणा प्राणायाम यावर लक्ष केंद्रित करावे. नात्यांमधील दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. एकाच वेळी अनेक कामे करणे टाळावे….
मकर – छोट्या गुंतवणुकीत फायदा. नवीन कार्यक्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. मानसिक स्थिती सांभाळा. जुने परिचित भेटतील…..
कुंभ – कलावंतांसाठी यशदायी सप्ताह. विवाह योग जमतील. प्रिय व्यक्तीचे संवाद होतील. जुना गुंतवणुकीत लाभ होईल….
मीन – प्रयत्नांची निश्चित दिशा ठरवावी. अनावश्यक योजना, संपर्क टाळावा. यशस्वी होण्यासाठी पूर्वानुभव उपयोगी येईल. योग्य नियोजन करून आर्थिक अडचण दूर होईल….
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा आहे.