वृषभ राशीच्या व्यक्तींना असे असेल २०२३ हे वर्ष
पंडित दिनेश पंत
वाचकांच्या आग्रहास्तव सर्व बारा राशींच्या लोकांना नवे वर्ष कसे जाणार याबाबतचा रोज एका राशीचा अंदाज दहा टिप्सच्या स्वरूपात आपण देणार आहोत.आज सर्वप्रथम आपण वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी २०२३ हे वर्ष कसे असेल ते जाणून घेऊ…
१) नवीन वर्षात आपणास अतिरिक्त खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरणार आहे. आपले स्टेटस जपण्यासाठी आपण करत असलेला सर्व प्रकारचा खर्च नवीन वर्षात मात्र आपल्याला नियंत्रणात ठेवावा लागणार आहे…
२) मागील काळात न झालेल्या वसुलीवर विशेष लक्ष देणे आवश्यक ठरेल. प्रसंगी सवलत देऊन, तडजोड स्वीकारून, वाद टाळून अशी वसुली करावी..
३) गरज नसल्यास सततचा वाहन बदल, त्याचप्रमाणे वाहनावरचा लक्झरीअस खर्च टाळावा. एकावेळी अनेक वाहन घेणे टाळावे..
४) केवळ लाईफस्टाईल म्हणून कपड्यांवरचा अतिरिक्त खर्च सांभाळावा. अर्जंट व इम्पॉर्टंट कामांमध्ये विभागणी करणे आवश्यक ठरणार आहे…
५) नवीन वर्षात आपणास भरपूर तसेच महत्त्वाच्या वास्तू विषयक, अर्थविषयक शुभवार्ता मिळणार आहेत..
६) विद्यार्थ्यांसाठी प्रगतीची नवी दालने खुली होतील. विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी आर्किटेक्ट, ग्राफिक डिझायनिंग, ॲनिमेशन, फॅशन डिझायनिंग, मॉडेलिंग, उच्च प्रतीचे रत्नांचा व्यवसाय, शक्य असल्यास राजकारण, एअर होस्टेस, वायुदल, एचआर, डिझायनिंग क्षेत्रातील वस्तू इम्पोर्ट एक्सपोर्ट, या क्षेत्रात करिअर करावे..
७) महिला वर्गासाठी मागील वर्षी बाकी राहिलेली सर्व प्रकारची महत्त्वाची तसेच मनात असलेली खरेदी यंदा मनासारखी पूर्ण होईल..
८) मोठा आर्थिक व्यवहार तडकाफडकी करू नये माहित नसलेल्या क्षेत्रात गुंतवणूक करू नये. अपरिचित व्यक्तीशी मोठा आर्थिक व्यवहार करू नये…
९) नोकरदारांना अचानक बढती योग लाभणार आहे. त्याचप्रमाणे नोकरीत बदलाने देखील प्रगतीची दारे खुली होणार आहेत. तर व्यवसायिकांना व्यवसाय वाढीची संधी, नवीन कर्ज प्रकरणांची मंजुरी मिळणार आहे…
१०) विशेष गरज नसल्यास परदेश प्रवास टाळावा, करावा लागल्यास तब्ब्येतीची विशेष काळजी मात्र घेणे आवश्यक ठरणार आहे …
टीप –
वरील टिप्स या वृषभ राशीसाठी सर्वसमावेशक आहेत. वृषभ राशीत असलेली कृतिका, रोहिणी, मृग या नक्षत्राप्रमाणे भिन्न तसेच कुंडली पाहून व्यक्तिगत सविस्तर सल्ला दिला जाईल….
महाराष्ट्रभर वास्तू व्हिजिट, कॉम्प्युटर, कुंडली, शुभनवरत्न, व्यक्तिगत सविस्तर ज्येष्ठ मार्गदर्शन भवानी ज्योतिष.. पं. दिनेशपंत ..फक्त व्हाट्सअप संपर्क 9373 91 34 84.
Horoscope Vrushabh Ras 2023 Year taurus by Pandit Dineshpant
