इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसोबत होळी उत्सव साजरा केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर या उत्सवाचे फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, ‘उत्सव रंगाचा, सण एकतेचा’ संपूर्ण कुटुंबाने नैसर्गिक रंगांची उधळण करत धुलिवंदनाचा सण साजरा केला.
आपल्या कुटुंबासह प्रेम, आनंद आणि रंगांची उधळण करत आपण पण हा सण साजरा केला असेलच. पुन्हा एकदा सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ठाणे येथील निवासस्थानी कुटुंबियासमवेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करत धुलिवंदनाचा सण साजरा केला. यावेळी पत्नी सौ. लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली, नातू रूद्रांश यांच्यासह कार्यकर्ते, माध्यमांचे प्रतिनिधी, पोलिस यांच्यासोबत धुळवड साजरी केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबरच त्यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रंग लावत धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या. परंपरेनुसार उपमुख्यमंत्रीशिंदे यांनी टेंभी नाक्यावरील आनंदआश्रम येथे जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राला रंग लावून त्यांना अभिवादन केले. तसेच आनंदाश्रम येथे जमलेल्या असंख्य शिवसैनिक आणि नागरिकांसोबत धुळवड साजरी केली.