मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी उद्योग समूहाचे विघ्न एवढ्यात संपणार नाहीत असे दिसत आहे. दररोज नवनव्या संकटांचा सामना त्यांना करावा लागत आहे. हिंडेनबर्गने अदानी उद्योग समूहावर ताशेरे ओढणारा रिपोर्ट प्रसिद्ध केल्यापासून कंपनीला सातत्याने कुठल्या ना कुठल्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आता तर चक्क बाजार नियामक सेबीच्याच रडारवर कंपनी आली आहे.
हिंडेनबर्गने दणका दिल्यानंतर अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यानंतर कंपनीने एफपीओ मागे घेतल्यामुळे मार्केटमधली विश्वासार्हता की झाली. आरबीआयने बँकांना कर्जाचा आढावा घेण्यास सांगितले. अदानींची संपत्ती निम्म्यावर आली. जागतिक प्रतिष्ठेला धक्का बसला. अगदी आठवड्याच्या सुरुवातीला तीन कंपन्यांचे शेअर्स वधारल्यामुळे जो काही दिलासा मिळाला तोच. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी हिमाचल प्रदेशमधील सीमेंट कंपन्यांवर धाडी पडल्या. आणि आता सेबीने अदानी उद्योग समूहाच्या शेअर मार्केटशी संबंधित प्रकरणाची एकूणच चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.
अदानी यांच्या काही गुंतवणुकदारांची चौकशी करणार आहे. एफपीओशी जोडलेल्या दोन अँकर गुंतवणुकदारांसोबत अदानी इंटरप्रायझेसचे संबंध तपासण्यास सुरुवात केली आहे. कंपनीचे दोन दूत गुंतवणुकदार ग्रेट इंटरनॅशनल टस्कर फंड आणि आयुष्मत लिमिटेड यांच्याशी असलेल्या संबंधांची सेबी चौकशी करणार आहे. अदानी एफपीओद्वारे ही चौकशी होईल
एफपीओ मागे घेतल्यामुळे
अदानी उद्योग समूहाने एफपीओ मागे घेतल्यामुळे चौकशीचा ससेमिरा लागला असल्याचे मार्केटमधील तज्ज्ञांनी म्हटले आहे. सहभाग खरेदी करताना अदानी उद्योग समूहाने नियमांचे उल्लंघन केले होते. त्याची चौकशी सेबी करीत आहे. अदानीने २० हजार कोटींचा एफपीओ जारी केला होता. तरीही तो मागे घेण्यात आला. आता एफपीओच्या प्रक्रियेची चौकशी सेबीद्वारे होणार आहे.
गुंतवणुकदार मॉरिशसमध्ये
अदानी उद्योग समूहाच्या एफपीओमध्ये गुंतवणुक करणारे दोन्ही अँकर गुंतवणुकदार मॉरिशसमध्ये आहेत. एफपीओचे व्यवस्थापन करणाऱ्या दहा गुंतवणुक बँकांपैकी एलारा कॅपिटल आणि मोनार्क नेटवर्थ कॅपिटल यांच्यावरही सेबी लक्ष ठेवून आहे. एफपीओमध्ये एलारा आणि मोनार्क यांच्यात काही संगनमत किंवा हितसंबंध आहेत का, याचाही तपास सेबी करीत आहे.
Hindenburg Report Gautam Adani SEBI Investment Enquiry