India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आरोग्य टीप्सः वजन कमी करायचं आहे? रात्रीचे जेवण असं घ्या

India Darpan by India Darpan
September 11, 2022
in राज्य
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या धावपळीचे जीवन, ताणतणाव, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे बहुतांश जण लठ्ठपणा म्हणजेच वजन वाढल्याच्या समस्येमुळे हैराण आहेत. वजन घटवण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणे अतिशय आवश्यक आहे. फळे आणि भाज्यांचा आहार शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पोषक मानला जातो. वजन कमी करण्यासाठी खासकरुन रात्रीचे जेवण अतिशय महत्त्वाचे ठरते. ते नेमके कसे असावे, याविषयी आपण आता जाणून धेणार आहोत..

फळ आणि भाज्यांमध्ये पोषण तत्त्व आणि कॅलरीचे प्रमाण समान असते. शिवाय फळ आणि भाज्यांचे सेवन करण्याचे फायदे वेगवेगळे आहेत. पण वजन घटवण्यासाठी नेमके काय खाणे योग्य ठरेल?तर आहारतज्ज्ञ सांगतात की, रात्रीचे जेवण हलके-फुलके घ्यावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. यापाठी मागे अनेक कारणे आहेत. यासाठी रात्रीच्या जेवणात अधिक तेल- मसाल्यांचा वापर करू नये. पचनास जड असलेले अन्न खाऊन झोपल्याने पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. पोट जड वाटणे किंवा मलावरोध असे त्रास या आहारामुळे होतात. शिवाय, असा आहार घेतल्याने झोपही व्यवस्थित पूर्ण होत नाही.

विशेष म्हणजे रात्रीच्या जेवणात मांसाहारी पदार्थांचा समावेश करू नये. कारण, मांसाहारी पदार्थ पचण्यास खूप जड असतात. मांसाहारी पदार्थ खाण्याची खूपच इच्छा झाल्यास ते अतिशय कमी प्रमाणात खावेत. रात्रीच्या वेळी मेटाबॉलिक रेट दिवसाच्या तुलनेत मंद असल्याने रात्री कधीही पोटभर जेवण करू नये. हलके जेवण केल्याने पचनक्रियेला जास्त मेहनत करावी लागत नाही. मसालेदार जवेण रात्रीच्य आहारात घेतल्यास ढेकर येणे, पोटात दाह होणे आणि गॅसेसचा त्रास होतो. म्हणून रात्रीच्या जेवणात मसाल्यांचे प्रमाण खूप कमी असावे.

रात्रीच्या वेळी जेवणात नियमितपणे सलाडचा समावेश करावा. वजन घटवण्यासाठी भाज्यांच्या तुलनेत फळे सर्वाधिक फायदेशीर असल्याचे या अभ्यासामध्ये स्पष्ट दिसत आहे. फळे सहजरित्या पचतात आणि कोणत्याही वेळेत डाएटमध्ये फळांचा समावेश करणंही सोयीचे आहे. फळांमध्ये अधिक प्रमाणात अँटी ऑक्सिडेंटचा समावेश असतो. फळे खाल्ल्याने भूक कमी लागते आणि दिवसभर अन्य कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही.

तोंडाला व पदार्थाला चव येण्यासाठी चिमूटभर मीठ, मिरेपूड आणि लिंबाच्या रसाचे काही थेंबही टाकावेत. रात्रीच्या जेवणात सर्व प्रकारच्या भाज्यांपासून तयार करण्यात आलेले सूप घेणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे सूप पचण्यास हलके असते. शिवाय त्यामध्ये अनावश्यक कॅलरीही नसते. रात्री जेवल्यानंतर ताबडतोब झोपू नये. यामुळे जेवण पचन होणार नाही. जेवण आणि झोपेत दोन ते तीन तासांचे अंतर असावे, असे तज्ज्ञ सांगतात.

जेवण केल्यावर लगेच झोपायचे असेल तर शतपावली करावी आणि नंतर झोपावे. शतपावलीमुळे जेवणाचे पचन लवकर होते. रात्री जेवण केल्यानंतर फळांचे सेवन करणेही लाभदायक आहे. परंतु, केळी आणि आंबा यासारखी फळेरात्री झोपताना खाऊ नये. आंबट फळे, बॅरीज आणि कलिंगड या फळांचे सेवन रात्री जेवणानंतर खाल्ल्यास त्याचा शरीराला लाभ होऊ शकतो. जेवण केल्याच्या अर्ध्या तासानंतरच फळांचे सेवन केले पाहीजे.

सध्या अनेकांची बिघडलेली जीवनशैली या वाढत्या वजनाचं मुख्य कारण आहे. अपुरी झोप, अवेळी जेवण करणे आणि पुरेसा पौष्टिक आहार न घेणे, यामुळे वजन वाढते. काही जण व्यायाम तर काही जण डाएटिंगचा अवलंब करत वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. प्रथिने आणि फायबर युक्त पदार्थ खाल्ल्याने पोट भरत आणि वजन कमी होण्यासही मदत होते. यासाठी तुम्ही जेवणाच्या वेळा पाळत योग्य आहार घेणं गरजेच आहे.

रात्रीच्या जेवणात हलका आणि पौष्टिक आहार मिळण्यासाठी येथे सांगितलेल्या अन्नपदार्थांच्या समावेश करावा. पालक डाळखिचडीमध्ये हिरव्या हिरव्या पालेभाज्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6, B9 आणि E सारख्या जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. तसेच हा लोहाचा एक उत्तम स्रोत आहे. हिरव्या पालेभाज्यामध्ये कॅरोटीनोइड्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते.

मूग डाळ फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे, जे रक्तदाब राखण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. तसेच पपईमुळे पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे पचन्यासाठी हलकं असल्याने यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे इडली हे भरपूर प्रमाणात फायबर असलेलं अन्न आहे. हे अतिशय हलकं आणि चवदार आहे. नाश्ता आणि रात्रीच्या जेवणात तुम्ही ओट्स खाऊ शकता.यामध्ये कॅलरीज कमी असल्याने वजनही कमी करता येते.

Health Tips Weight Loss Dinner Nutrition Food Diet


Previous Post

मराठवाडा मुक्ती गाथा-भाग ४ः मराठवाड्यात अशी स्थिरावली निजामशाही

Next Post

घरबसल्या पैसे कमवायचे आहेत? यापैकी कोणताही एक पर्याय निवडा

Next Post
प्रातिनिधीक फोटो

घरबसल्या पैसे कमवायचे आहेत? यापैकी कोणताही एक पर्याय निवडा

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group