मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या शरीरात बहुतेक वेळा युरिक अॅसिडची पातळी तेव्हा वाढते जेव्हा तुमचे मूत्रपिंड कार्यक्षमतेने यूरिक अॅसिड काढून टाकण्यास असमर्थ असतात. ज्या गोष्टींमुळे मूत्रपिंड यूरिक ऍसिड काढून टाकू शकत नाही, त्यामध्ये भरपूर अन्न खाणे, जास्त वजन, मधुमेह, विशिष्ट लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ घेणे आणि जास्त मद्यपान या कारणांचा समावेश होतो.
युरिक अॅसिडची मात्रा वाढल्याने अनेक आजारांचा धोकाही वाढतो. या आजारांमध्ये प्रामुख्याने गाउट, हृदयविकार, किडनीशी संबंधित समस्यांचा समावेश होतो. यूरिक अॅसिडचे सामान्य प्रमाण किती असावे? पुरुषांमध्ये ३.४ते ७.० मिलीग्राम पर्यंत युरिक अॅसिड, महिलांमध्ये २.४ते ६.० मिलीग्रॅम पर्यंत असल्यास कोणताही धोका नाही. जर तुमच्या युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले असेल तर तुम्ही काही उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवू शकता. सांधेदुखी आहे का? जर असेल तर सावधगिरी बाळगा कारण तुमच्या शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असू शकते.
शरीरातील युरीक अॅसिडची मात्रा वाढण्यामागचे एक मोठे कारण एका संशोधनातून समोर आले आणि ते कारण होते प्रोटीनयुक्त डायटचे! जो व्यक्ती जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त डायट खातो त्याच्या शरीरातील युरीक अॅसिडचे प्रमाण वेगाने वाढत असते. त्यामुळे ज्या व्यक्तींना युरीक अॅसिडची समस्या आहे त्यांनी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारातील समवेश कमी करावा आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात करावी.
आहारात असे पदार्थ खावेत ज्यात जास्त प्रमाणात फायबर असेल. हे फायबर तुम्हाला हंगामी फळे, पालेभाज्या आणि ड्रायफ्रुट्स यातून मिळू शकते. ड्रायफ्रुट्स मध्ये खास करून मखाना, खजूर आणि अक्रोड खावे. यातून जास्तीत जास्त फायबर शरीराला मिळेल. शरीरातील मूत्रपिंडाची फिल्टरिंग क्षमता कोणत्याही कारणाने कमी होते, तेव्हा शरीरातील युरियाचे यूरिक अॅसिडमध्ये रूपांतर होते जे हाडांमध्ये जमा होते. यूरिक अॅसिड शरीराच्या पेशी आणि आपण खात असलेल्या गोष्टींद्वारे बनवले जाते. यातील बहुतेक युरिक अॅसिड किडनीद्वारे फिल्टर केले जाते, जे शौचालयाद्वारे शरीराबाहेर जाते.
शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असेल किंवा किडनी ते फिल्टर करू शकत नसेल, तर रक्तातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. नंतर ते हाडांमध्ये जमा होते आणि त्यामुळे गाठीची समस्या उद्भवते. युरिक ऍसिड वाढल्याने शरीराच्या स्नायूंमध्ये जळजळ होते, ज्यामुळे वेदना होतात आणि ही वेदना शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते. संधिरोग, संधिवात यांसारख्या समस्या उद्भवू लागतात.
सध्याचा आहार आणि जीवनशैलीतील बदल हे युरिक अॅसिड वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. आपण मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्या शरीरात युरिक ऍसिड वाढण्याची खात्री आहे कारण मधुमेहाची औषधे युरिक अॅसिड वाढवतात. लाल मांस, सीफूड, मसूर, राजमा, मशरूम, कोबी, टोमॅटो, मटार, पनीर, भेंडी, आर्बी आणि तांदूळ खाल्ल्याने देखील यूरिक अॅसिड वाढते.
रक्तदाबाची औषधे, वेदना कमी करणारी आणि कर्करोगविरोधी औषधे घेतल्यानेही युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. एका हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, यूरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी रेड मीट, ऑर्गन मीट, मासे यासारख्या पदार्थांचे सेवन करू नये. सोप्या भाषेत सांगायचे तर मांसाहारापासून दूर राहून यूरिक अॅसिड नियंत्रणात ठेवू शकता. त्याऐवजी हेल्दी फूड घेऊ शकता.
शर्करायुक्त पेये आणि पदार्थांपासून दूर राहा. तसेच सोडा, कोल्ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स किंवा पॅकेज केलेले ज्यूस पीत असाल तर लगेच बंद करा. ही पेये तुमच्या युरिक अॅसिडची पातळी वाढवू शकतात. तसेच साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणे टाळा. साखरेचे जास्त सेवन केल्याने युरिक अॅसिडची समस्या वाढू शकते. साखरेमुळे उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो.
Health Tips Uric Acid Symptoms Control Treatment