मुकुंद बाविस्कर, मुंबई
मधुमेह हा एक असाध्य रोग असून एकदा आपल्या शरीरात आला की, आयुष्यभर राहतो. रक्तातील साखर वाढल्यास या आजारावर नियंत्रण ठेवणे कठीण काम आहे. तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखरेची पातळी जास्त राहिल्यास आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. मूत्रपिंड, यकृत, मेंदू यासह शरीराच्या अनेक महत्त्वपूर्ण अवयवांना याचा त्रास होतो. मधुमेहाचे मुख्य कारण अद्याप समजू शकलेले नाही. तथापि, अशी अनेक लक्षणे आहेत जी मधुमेहाचे सूचक आहेत.
अनेक हृदयरोग तज्ज्ञ व मधुमेह तज्ज्ञ वेगवेगळ्या टीप्स देत असतात. त्याचे तंतोतंत पालन झाले तर रुग्णांना त्याचा लाभ नक्कीच होतो. मधुमेह डॉ. ए. के. गुप्ता यांचे नुकतेच एका चर्चासत्रात भाषण झाले. ते म्हणाले की, जागतिक स्तरावर मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नियंत्रणासाठी सरकार, सर्वसामान्यांनाही पुढे यावे लागेल.
यावेळी डॉ.गुप्ता यांनी सांगितले की, आज जीवनशैलीत बदल करून आणि आहारावर नियंत्रण ठेवून आणि सामान्य दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचा समावेश करून मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, परंतु तो नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सात सूत्री मंत्र सांगताना सामान्यांना त्याचा रोजच्या दिनक्रमात समावेश करण्याची गरज त्यांनी सांगितली.
डॉ. गुप्ता म्हणाले की, प्रत्येकाने आपले वजन नियंत्रणात ठेवावे. त्याकरिता पुरुषांची कंबर ९० सेमीपेक्षा जास्त आणि महिलांची कंबर ८० सेमीपेक्षा जास्त नसावी. त्यांनी सर्वसामान्यांना सक्रिय राहून दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम किंवा चालण्याची विनंतीही त्यांनी केली. तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानापासून दूर राहा. मधुमेहाच्या रुग्णाने रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवावी. त्यासाठी त्यांनी दर तीन महिन्यांनी दर तीन महिन्यांनी ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिनची तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. मधुमेहाची सूचक लक्षणे दिसताच अजिबात दुर्लक्ष करु नका. तत्काळ जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. आता आपण या आजाराच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊ…
वारंवार मूत्रविसर्जन
शरीतात रक्तातील साखरेची पातळी जास्त असते, मूत्रपिंड रक्त शुध्दीकरणाचे कार्य थांबवते. यामुळे मूत्रात साखरेची पातळी वाढते. यामुळे पीडित व्यक्तीला वारंवार लघवीला जावे लागते. याव्यतिरिक्त, जंतु संसर्गामुळे देखील आजार वाढू शकते. अशा परिस्थितीत, कृपया डॉक्टरांशी संपर्क साधावा.
अचानक वजन कमी होणे
अचानक वेगवान वजन कमी झाले तर ते मधुमेहाचे प्राथमिक लक्षण आहे. यामुळे, उर्जेचे कार्य शरीरात साठवलेल्या अतिरिक्त चरबीद्वारे केले जाते. यामुळे वजन वेगाने कमी होते. जर प्रयत्न न करता वजन कमी झाले तर तपासणी करावी.
डोळ्यातून अस्पष्ट दिसणे
मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे डोळ्यांने कमी दिसणे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहामुळे दृष्टी कमी होते. अशा परिस्थितीत, वेळ वाया न घालवता रक्ताची आणि डोळ्यांची तपासणी करावी.
अति प्रमाणात थकवा
रक्तातील साखरेच्या अति प्रमाणामुळे थकवा येतो. एखादे छोटेसे काम करुन ती व्यक्ती थकते. अशा स्थितीत त्या व्यक्तीची त्वचा कोरडी होण्यास सुरवात होते.
त्वचेत बदल
मधुमेह झाल्यावर त्वचेत विशेष बदल घडतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या स्थितीला बॉर्डरलाइन मधुमेह म्हणतात, म्हणजे ही मधुमेहाची सुरुवात असते. तसेच कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा.
आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या काळात जीवनशैली मध्ये बदल झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. विशेषत: लठ्ठपणा आणि मधुमेह यासारख्या समस्यांनी अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील करण्यात येतात. परंतु त्यामुळे फारसा बदल जाणवत नाही, मात्र ड्रॅगन फ्रुट मुळे खूप फायदा होऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
मधुमेह किंवा डायबेटिस हा बदललेल्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या विविध आजारांपैकी एक बनला आहे. मधुमेहाच्या विळख्याने आपणा भारतीयांना अक्षरश: गिळंकृत केले आहे. मधुमेहाचे, टाइप १ आणि टाइप २ असे दोन प्रकार आहेत. टाइप-१ या प्रकारात शरीरात इन्सुलीन स्रवत नाही किंवा ते अत्यंत कमी प्रमाणात स्रवते. हे रुग्ण इन्सुलीनच्या इंजेक्शनशिवाय जगू शकत नाही. टाइप-२ या प्रकारात इन्सुलीन कमी प्रमाणात स्रवते, पण या रुग्णांमध्ये गोळ्यांमुळे मधुमेह आटोक्यात येऊ शकतो.
तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवण्यासाठी स्निग्ध पदार्थांचे सेवन कमी करावे. गरज भासल्यास औषधे घ्यावीत. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी सांगितलेल्या तपासण्या कराव्यात. हे सर्व केल्यास एकतर तुम्ही मधुमेह होण्यापासून स्वत:चा बचाव करू शकता किंवा मधुमेह झाल्यास त्याची नीट काळजी घेऊन त्यापासून होणारे वाईट परिणाम टाळू शकता.
मधुमेह असल्यास आपण डोळ्यांचा जास्त वापर केल्याने भीती वाढत असून यावर सावध राहिले पाहिजे. तसेच, जर कोविड झाला असेल आणि आपल्याला स्टिरॉइड्स देण्यात आले असतील तर आपण थोडे सावधगिरी बाळगले पाहिजे. बर्याच वेळा आपण डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो, कारण डॉक्टरकडे जाण्यास उशीर झाल्यास डोळ्याचा प्रकाश कमी होण्याचा धोका असतो. या व्यतिरिक्त, जर रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर आपण नियमित तपासणी करत रहावे.
साधारणतः अंधत्व हे वयामानामुळे होणाऱ्या मॅक्युलर डीजेनेरेशन (एएमडी) मुळे येऊ शकते. कारण हा रोग मॅकुलाने प्रदान केलेल्या मध्यवर्ती दृष्टीला प्रभावित करतो. त्याचप्रमाणे एक रेटिनाचा रोग हा अंधत्व ला कारणीभूत ठरतो, तो म्हणजे मधुमेह रेटिनोपैथी होय, मधुमेह असलेल्या रुग्णांना डोळयातील पडदा सूज येणे किंवा रक्तस्त्राव होणे किंवा रेटिना अलिप्तपणामुळे दृष्टी कमी होऊ शकते.
हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका यांचा जवळचा संबंध आहे. टाईप -२ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कृत्रिम साखरामुळे अचानक इन्सुलिनची पातळी वाढते, ती शरीर शोषू शकत नाही. त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या वाढू शकतात. स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढत आहे.
रिसर्चगेट डॉटनेटवर प्रकाशित केलेल्या एका संशोधन लेखानुसार केळीच्या फुलामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. ग्लिसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेट्समधून किती वेळ ग्लूकोज तयार होतो हे मोजण्याची प्रक्रिया आहे. ग्लुकोजचे सेवन केल्यामुळे ते कमी होते. यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडेंट देखील असून ते मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त आहेत. त्यामुळे मधुमेह रुग्ण केळीची फुले खाऊ शकतात. तसेच त्याची भाजीही बनवता येते.
मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेण्याचा आणि गोड पदार्थ न घेण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी लसूण फायदेशीर ठरू शकतो, असे मत मधुमेह तज्ज्ञ डॉ. अंबिका प्रसाद यादव यांनी व्यक्त केले आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी लसूण खूप उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लसणामध्ये असलेले अमीनो आम्ल होमोसिस्टीनचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी आहे, ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.