पुणे – वजन कमी करण्यासाठी असो किंवा कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी असो. ब्राऊन राइसचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ब्राऊन राइस (तपकिरी किंवा उकडा तांदूळ) हे साध्या तांदूळाचे नैसर्गिक रूप आहे. पांढऱ्या तांदळाला पॉलिश केल्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. तर या तांदळातील खनिजे, फायबर आणि बी-कॉम्प्लेक्स यांसारखे पोषक घटक कायम राहतात.
फायद्याऐवजी नुकसान
या तांदळात जीवनसत्त्वे, खनिजे, मॅंगनीज आणि अँटिऑक्सिडंट असतात. या शिवाय कर्बोदकांसोबतच फायबर, प्रोटीन, फोलेट, रिबोफ्लेविन (B2), पोटॅशियम आणि कॅल्शियम देखील यामध्ये आढळतात. तपकिरी तांदूळ बहुतेकदा निरोगी आहाराशी संबंधित असतो. पण आपल्याला माहीत आहे का की गरजेपेक्षा जास्त ब्राऊन राईस खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
दुष्परिणाम
फायटिक अॅसिड- ब्राऊन राइसमध्ये फायटिक अॅसिड भरपूर असते. हे एक विरोधी पोषक आहे. ज्यामुळे शरीराला लोह, झिंक, मॅग्नेशियम सारखी खनिजे शोषून घेणे कठीण होते.
लोह
निरोगी राहण्यासाठी लोह शोषून घेणे खूप महत्वाचे आहे. परंतु या तांदळात असलेले फायटिक अॅसिड शरीरातील खनिजे, विशेषतः लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे शोषण मर्यादित करते. त्यामुळे शरीराला पोषक तत्वांचा जास्त फायदा होत नाही.
फायबरचे प्रमाण
ब्राऊन राइसमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, कमकुवत पचनसंस्था असलेल्या लोकांना समस्या उद्भवू शकतात. जास्त फायबरयुक्त पदार्थांमुळे डायरिया, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
उच्च आर्सेनिक
आर्सेनिक हा नैसर्गिकरित्या आढळणारा घटक आहे जो माती आणि पाण्यात आढळतो. ते विषारी असू शकते. ब्राऊन राइसमध्ये आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते, नियमितपणे मोठ्या प्रमाणात ब्राऊन राईस खाल्ल्याने उलट्या, डोकेदुखी आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
आरोग्य समस्या
या तांदूळामुळे आरोग्य समस्या होऊ शकतात. उदा. मळमळ, कावीळ, अतिसार, पोटाच्या संबंधित समस्या तसेच जळजळ, मूळव्याध, सोरायसिस आणि इतर त्वचा रोग होऊ शकतो.