India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तब्बल १७०० वर्षांपूर्वीचे हे सूर्य मंदिर एकदा अवश्य बघाच; कुठे आहे ते? कसे जायचे? घ्या जाणून सविस्तर…

India Darpan by India Darpan
July 29, 2022
in विशेष लेख
0

 

मार्तंड सूर्य मंदिर

आपल्या देशात दोन सूर्य मंदिरं आहेत हे किती भारतीयांना माहित आहे? याचे उत्तर आहे, अर्थात फारच थोड्या. पण होय, भारतात दोन सूर्य मंदीर आहेत. ओडिसा राज्यातील कोणार्कचे सूर्य मंदिर सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु दुसरे सूर्य मंदिर हे काश्मीर खोर्‍यातील दक्षिण भागात अनंतनाग जवळ मटन येथे आहे.

दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880

मार्तंड सूर्य मंदिराबद्दल आपल्याला फारशी कल्पना नाही. आपण श्रीनगर येथून प्रसिद्ध पहेलगाम येथे जातांना रस्त्यात अनंतनाग हे गाव लागते. अनंतनाग जवळ पूर्वीचे मार्तंड व सध्याचे  मटन येथे एका पठारावर हे सुवर्ण मंदिर बांधण्यात आले आहे. अशा या प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या सूर्य मंदिराची आज आपण आपल्या हटके डेस्टिनेशन या मालिकेतून सैर करणार आहोत.

हे मंदिर साधारण १७०० वर्षांपूर्वी सूर्यवंशीय राजा ललितादित्य याने बांधले आहे. भगवान सूर्याची उपासना करण्यासाठी या मंदिराची निर्मिती केली गेली, असल्याचा उल्लेख सापडतो. या मंदिराची विशेष बाब म्हणजे हे मंदिर आपली स्थापत्यकला आणि सुंदरता यासाठी विख्यात आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या लक्षात आलेच असेल की, मंदिर मुळातच काश्मीर खोर्‍यात असल्याने आजूबाजूच्या परिसरातील चारी बाजूंना असलेले बर्फाच्छादित पर्वत, देवदार वृक्ष, सर्वत्र हिरवळ अशी निसर्गाची मुक्त उधळण असते. त्यामुळे मंदिर आणि परिसराची सुंदरता अधिक वाढली आहे. हे मंदिर रोम येथील डेरीक वास्तुशैलीशी मिळते जुळते आहे.

या मंदिरास प्रचंड मोठे अंगण लाभले आहे. या भव्य-दिव्य मंदिरास सुमारे ८४ कक्ष होते. आता त्याचे भग्न अवशेष पहावयास मिळतात. मंदिराच्या बांधकामात स्थानिक दगड व चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमे दिशेकडे असल्याने हिंदू धर्म ग्रंथामध्ये या मंदिराचे विशेष महत्व आहे. मार्तंड सूर्य मंदिर काश्मीरी वास्तुशैलीत बांधलेले बहुधा एकमेव उदाहरण असेल. असे म्हटले जाते की, या मंदिरातून भव्य काश्मीर खोर्‍याचे दर्शन होते.

अप्रसिद्ध असलेल्या या सूर्य मंदिरात अलिकडेच बाॅलिवूडच्या विशाल भारद्वाज निर्मित बहुचर्चित हैदर चित्रपटाचे शुटिंग झाले आहे. यात शाहिद कपूर व श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका होती. अतिशय रम्य परिसरात उभ्या असलेल्या या मंदिराचा जिर्णौद्धार व्हायला हवा. तो झाल्यास आणि त्याला पूर्वीचे वैभव मिळाल्यास देशातील प्रमुख मंदिरात मार्तंड सूर्य मंदिराचा उल्लेख होईल, हे नक्की. प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या काश्मीरला अवश्य भेट द्यावी. श्रीनगर येथून पहेलगाम येथे जातांना रस्त्यात अनंतनाग जवळील मार्तंड सूर्य मंदिरात थोडा वेळ द्यावा.

कसे पोहचाल
अनंतनाग येथे विमानाने जाण्यासाठी सगळ्यात जवळचे विमानतळ श्रीनगर येथे आहे. अनंतनाग ते श्रीनगर हे अंतर ५८ किलोमीटर एवढे आहे. पुढे टॅक्सीने जाता येते. या परिसरात रेल्वेमार्ग उपलब्ध नाही.
कोठे रहाल
संपूर्ण परिसरात भरपूर हाॅटेल्स आहेत. मात्र पहेलगाम येथे जास्त चांगली हाॅटेल्स आहेत.
काय बघाल
निसर्गाची उधळण असलेल्या या भागात कुठेही जा. सगळीकडे निसर्गसौंदर्य भरलेलं आहे. पहेलगाम येथे बेताबवाडी, आरु व्हॅली, बैसरण व्हॅली, चंदनवाडी अशी भरपूर पर्यटन स्थळे आहेत.

Hatke Tourist Destination Martand Surya Mandir by Datta Bhalerao Kashmir Himalaya Anantnag Pahelgam Tourism Incredible India


Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – ३० जुलै २०२२

Next Post

या कलाकारांना मिळेल सुवार्ता; जाणून घ्या, शनिवार ३० जुलैचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या कलाकारांना मिळेल सुवार्ता; जाणून घ्या, शनिवार ३० जुलैचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group