India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गुजरातमध्ये गेलेला वेदांताचा प्रकल्प उभारण्याबाबत टेन्शन; हे आहे कारण…

India Darpan by India Darpan
January 1, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुमारे २ ते ३ महिन्यांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला असताना यासाठी जबाबदार कोण यावरून तेव्हा वादंग माजले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडले. तर विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले होते. मुख्यमंत्र्यांनी गेलेला प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला विरोधी पक्षातील नेत्यांनी दिला होता. मात्र आता गुजरातमध्ये गेलेला वेदांताचा प्रकल्प उभारण्यासाठी अनिल अगरवाल यांना गुंतवणूकदार मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.

अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून सांगितले होते की, आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहोत. आम्ही लवकरच एक हब तयार करू जिथे महाराष्ट्र आमच्या फॉरवर्ड इंटिग्रेशनचा भाग असेल. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लास उत्पादनातील आमची गुंतवणूक देशभरातील उद्योगांची इकोसिस्टम तयार करेल. कारण तळेगावमध्ये सेमीकंडर निर्मिती प्रकल्प उभारला जाणार होता. मात्र हा प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पाची घोषणा पूर्ण होण्यापूर्वी वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल अस्वस्थ होते.

एकीकडे महाराष्ट्रात होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. यावरून अद्यापही यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये उभारत असलेल्या सेमीकंडक्टर चीपच्या प्रकल्पाला वित्त पुरवठादार सापडत नसल्याचे सांगितले जात आहे. वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला गुजरातमध्ये प्रकल्प उभा करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अनिल अगरवाल यांच्या प्रतिनिधींनी पश्चिम आशिया, सिंगापूर आणि यूएसमध्ये अनेक वित्त पुरवठादारांची मोठ्या निधीसाठी भेट घेतली, अशी माहिती समोर आली आहे.

खरे म्हणजे अब्जाधीश अनिल अगरवाल हे नियोजित १.५४ लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या सेमीकंडक्टर चीप निर्मिती प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ मिळवताना अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामूळे मूळ महाराष्ट्रातील नियोजित प्रकल्प अकस्मात गुजरातला हलविण्याच्या निर्णयावरून बराच राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना, या प्रकल्पला गुजरातमध्ये प्रत्यक्ष सुरुवात होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गुजरातमधील वेदांता-फॉक्सकॉनच्या नियोजित चीप निर्मितीच्या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी वेदांता कंपनीचे प्रतिनिधी गेल्या तीन महिन्यांपासून आखाती देश, सिंगापूर आणि अमेरिकेत सतत प्रयत्न करत आहेत. गुंतवणुकीच्या संधीच्या शोधात असलेल्या तेथील फंडांपुढे कंपनीकडून प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र, कोणत्याही फंडांकडून प्रत्यक्ष कार्यवाही होताना दिसत नाही. वास्तविक पाहता वाढती सेमीकंडक्टर चीपची मागणी व तुलनेने अल्प पुरवठा अशी स्थिती असलेल्या या क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षक असली तरी अगरवाल यांनी ज्या गुंतवणूकदारांपुढे प्रकल्पासंदर्भातील प्रस्ताव मांडला आहे, त्यांनी या क्षेत्रातील समूहाच्या मर्यादित अनुभवाबाबत आणि ताणलेल्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यानच्या काळात बहुचर्चित वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब बनवण्याचा प्रोजेक्ट स्वतःच्या राज्यात यावा यासाठी, भारतातील अग्रगण्य उद्योगप्रधान राज्यांनी वेदांता कंपनीसमोर पायघड्या घातल्या होत्या. त्यात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक ही राज्य आघाडीवर होती. परंतु शेवटी वेदांता कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि हा प्रोजेक्ट गुजरातच्या ढोलेरा सिटीमध्ये सुरु होणार असल्याची घोषणा केली.

नवीन वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. असे ट्विट अनिल अगरवाल यांनी केले होते. परंतु परदेशातील गुंतवणूकदाराने वेदांताच्या भारतातील प्लांटमध्ये गुंतवणूक करण्यास तयारी दर्शविली नाही, पण भारतासह आंतराराष्ट्रीय राजकारणात महत्व असलेला हा प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत योजनेत देखील महत्वाचा प्रोजेक्ट मानला जातो. मात्र सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे कंपनीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कंपनीने कधीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं उत्पादन केलेलं नाही. वेदांता कंपनी ही फक्त खाणकाम आणि वेगवगेळ्या धातूंच्या प्रोडक्शनचे काम करते. वेदांता कंपनीचा सर्व व्यवसाय हा खाणकाम आणि धातूंचे उत्पादन करण्यापुरतेच मर्यादित आहे. कंपनीने कधीही दुसऱ्या वस्तूंची किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे उत्पादन केले नाही, त्यामुळे सेमीकंडक्टरच्या क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यावर तसेच गुंतवणूकदार वेदांता कंपनीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत, असे सांगितले जात आहे.

Gujrat Vedanta Foxconn Project Investment Struggle
Investor


Previous Post

‘आरटीओ’च्या ‘त्या’ ५ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी; राज्य सरकारचा निर्णय

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group