अहमदाबाद – गेल्या सहा महिन्यांपासून देशभरात अमली पदार्थ तस्करीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अगदी पंजाबपासून ते महाराष्ट्रपर्यंत अनेक राज्यांमध्ये अमली पदार्थाची प्रकरणे उघड झाली असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यातच आता गुजरात मध्ये देखील एटीएसच्या पथकाने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वीच गुजरात मध्ये अशाच प्रकारे ड्रग्स हा मोठा साठा जप्त करण्यात आला होता.
गुजरात एटीएसने मोरबी जिल्ह्यात ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मलिया मियाना येथून १२०किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जची बाजारातील किंमत अंदाजे ६०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पाकिस्तानातील ड्रग माफिया खालिद बख्शशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानातूनच हे अंमली पदार्थ भारतात आणले जात असल्याची माहिती आहे.
ड्रग्जच्या तस्करी प्रकरणी गुजरात एटीएसने तीन जणांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडण्यात आलं होतं. महिनाभर आधी तब्बल ९ हजार कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रानंतर गुजरातध्येही ड्रग्जचे प्रकरणी खळवळ उडण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात संशय असलेल्या खालिद नावाच्या व्यक्तीचा संपर्क थेट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी असल्याची शक्यता आहे. पाकिस्तानी ड्रग्ज माफिया खालिद याने जब्बार आणि गुलाम नावाच्या दोन भारतीय तस्करांची दुबईतील सोमालिया कॅन्टीनमध्ये भेट घेतली होती. सध्या पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. विशेष म्हणजे यापुर्वीही पाकिस्तानी ड्रग माफिया खालिद याने ड्रग्जचा मोठा साठा भारतात पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा गुजरातमधील पोलिसांनी द्वारका आणि सुरतमध्ये हेरॉइनसह अनेक अंमली पदार्थ जप्त केले. तेव्हा तीन आरोपींनाही अटक करण्यात आली होती. त्याची किंमत सुमारे ८८ कोटी रुपये आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
ATS apprehended three persons with 120 kg heroin worth Rs 600 crores. Preliminary investigation revealed that the consignment of heroin was brought by the accused via sea route where they had received a delivery from a Pakistani boat: DGP Ashish Bhatia pic.twitter.com/VQ4LEdfnQS
— ANI (@ANI) November 15, 2021
अदानी समूहाकडे मालकी असलेल्या गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवरुन तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं होते. याची किंमत सुमारे ९ हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.अफगाणिस्तानमधून या ड्रग्जची तस्करी झाली होती. याप्रकरणी देशभरात छापेमारी करण्यात आली. दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी येथे एटीएसमार्फत छापेमारी करण्यात आली होती. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे.