मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे खनिकर्म मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दोन युवकांना शिव्या देत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ ट्विट करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. थेट पोलिसासमोर युवकांना मारहाण करुन पालकमंत्री कायदा हातात घेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल करणार असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे.
आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंत्री दादा भूसे फटकावतात . शिव्या देतात. मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलिस घेणार.
पोलिसांसमोर मारले. माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत. supreme court मध्ये. रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक. आता बोला. मुख्यमंत्री @mieknathshinde माझ्यासाठी वाकिलांची फौझ. पोलिसांची खोटी प्रतिज्ञा पत्र supreme courtat द्यायला लावलीत. मी सराईत गुन्हेगार आहे, असे पोलिस सर्वोच्च न्यायलयात प्रतिज्ञा पत्र देतात. वाह साहेब, आपण मला फाशी देऊ शकत नाही किंवा मुड्दा ही पाडू शकत नाही. माझ्या विरुद्ध जिने ३५४ दाखल केला, जिने रात्री आपली भेट घेतली… तिच्या विरुद्ध जबरदस्ती करुन छोट्या पोरींना शरीर विक्री करण्याचा गुन्हा नोंद झाला आहे. आपण माझे आयुष्य उद्धवस्त करण्यासाठी कारस्थान रचलात.. आपण मित्र होतो… विसरलात
बघा दादा भुसे यांचा हा व्हिडिओ
मंत्री दादा भूसे फटकावतात .
शिव्या देतात
मुख्यमंत्री साहेब
कुठला गुन्हा पोलिस घेणार
पोलिसां समोर मारले
माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत supreme court मध्ये
रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक
आता बोला .. pic.twitter.com/EGsJmvApfI— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 26, 2022
नेमका काय प्रकार आहे
हा व्हिडिओ मालेगाव येतील आहे. मालेगावमध्ये दादा भुसे यांनी शिवपुराण कथेचे आयोजन केले आहे. त्यास प्रचंड प्रतिसाद आहे. शेकडो भाविक मालेगावमध्ये येत आहेत. याच कार्यक्रमात काही तरुण चोरी आणि महिलांची छेड काढण्याचा प्रकार करीत आहेत. तशी तक्रार दादा भुसे यांच्याकडे आली होती. यासंदर्भात भुसे यांनी सांगितले की, या तक्रारीनंतर मी पोलिसांना सांगितले होते की, या तरुणांना कार्यक्रमात प्रवेश देऊ नका. तरीही दोन तरुण तेथे आले. त्यानंतर दादा भुसे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी दोन तरुणांना मारहाण केली आहे. तसेच, या तरुणांना शिव्याही दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Guardian Minister Dada Bhuse Beaten Youth Video Viral