सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विवाहांमध्ये जास्त गर्दी असल्यास कायदेशीर कारवाई करा; छगन भुजबळांचे निर्देश

by India Darpan
जुलै 10, 2021 | 2:12 pm
in स्थानिक बातम्या
0
bhujwal

नाशिक – नागरिकांनी लग्न सोहळे तसेच इतर घरगुती सोहळे करताना गर्दी करू नये. यासारख्या सोहळ्यांमुळे रुग्ण अधिक वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असून पोलीस प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे, जास्त गर्दी होत असेल तर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक स्वामी रिसॉर्ट, लासलगाव येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच तथा मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर,जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ थोरे, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ.अर्चना पठारे,  तहसीलदार शरद घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी श्री. खैरे, येवला ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, गटविकास अधिकारी संदीप कराड, डॉ.उन्मेष देशमुख, शाखा अभियंता गणेश चौधरी, उपशाखा अभियंता गोसावी, येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजनांबाबत आराखडा तयार करण्यात यावा. लसीकरणाबाबत अधिक केंद्र वाढविण्याबाबत नियोजन करण्यात यावे. तसेच ऑक्सिजन जनरेशन प्लँटच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तातडीने बसविण्यात यावेत. शासकीय रूग्णालयातील रिक्त  पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील लसीकरणाच्या अनुषंगाने आवश्यक नवीन लसीकरण केंद्र स्थापन  करून केंद्राची संख्या वाढवावी. लसींची उपलब्धता लक्षात घेऊन ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली आहे, त्यांना दुसरी लस देण्याची पूर्तता प्रामुख्याने करण्यात यावी. लग्न समारंभास परवानगी देताना शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन होणे अधिक गरजेचे असून या ठिकाणी  सॅनिटाझर, मास्क व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे  पालन होते किंवा नाही  हे पोलिस यंत्रणेने तपासणे गरजेचे आहे. तालुक्यात व शहरात  गृहविलगीकरणात ठेवलेल्या रूग्णांची  वेळोवेळी तपासणी करावी. ज्या गृहविलगीकरणात रूग्णांची व्यवस्था पुरेशी नसेल, अशा रूग्णांना तातडीने रूग्णालयात स्थलांतरीत करण्यात यावे.
कोरोनासोबत आता म्युकरमायकोसिस, डेल्टा प्लस व लॅमडा  या नवीन आजारांचे आगमन होत असताना, प्रत्येकाने   जबाबदार नागरिक म्हणून स्वतासोबत आपल्या कुटूंबियांची काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा व तालुक्यातील बाजर समिती यांनी सुध्दा बाजार समितीमध्ये  नागरिकांना प्रवेश देतेवेळी  योग्य दक्षात घ्यावी. तपासणी केल्याशिवाय बाजार समितीत प्रवेश निषिध्द करावा, असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पुढील पाऊल टाकावे
यावेळी पीक परिस्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी आगामी पावसाचा अंदाज घेऊनच, आवश्यक पेरणी करावी. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी कृषि अधिकारी यांनी  शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. युरिया व खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवल्यास आगामी काळात त्याचा तुटवडा भासणार नाही, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री  श्री. भुजबळ यांनी यावेळी केल्या आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

Next Post

संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या १९ तारखेपासून

Next Post

संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या १९ तारखेपासून

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011