India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

GST करचोरी करताय? आता होणार अशी कठोर कायदेशीर कारवाई; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

India Darpan by India Darpan
September 11, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – करचुकवेगिरी विरोधात आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. GST करचोरी झाल्यास आता अधिकारी संबंधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतात. अर्थ मंत्रालयाने याविषयीची माहिती दिली आहे. पण ही कारवाई सरसकट केली जाणार नाही. त्यासाठी सबळ पुरावे जमा केले जातील. तपास होईल. दोष सिद्धता आढळल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई होणार आहे. यापूर्वी पेक्षा आता कडक कारवाई होणार आहे.

वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत जीएसटी तपास युनिटने कायदेशीर कारवाईसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. करचुकवेगिरीची रक्कम, आयटीसीचा गैरवापर किंवा फसव्या परताव्याची रक्कम ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ही आर्थिक मर्यादा नेहमीच्या कर चुकवेगिरीच्या प्रकरणात लागू होणार नाही, असे वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच महिन्यांसारखेच जीएसटी संकलन ऑगस्ट महिन्यातही तडाखेबंद झाले. सलग ऑगस्टपर्यंत जीएसटी संकलनात विक्रमी वाढ झाली आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, वस्तू आणि सेवा कर GST संकलनात ऑगस्टमध्ये २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलै महिन्यातही सरकारला जीएसटीमधून चांगली कमाई झाली होती. ऑगस्ट महिन्यात जीएसटी २८ टक्क्यांनी वाढून १.४३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कराने केंद्र सरकारला मालामाल केले आहे. सलग सहाव्या महिन्यात जीएसटी संकलन १.४ लाख कोटींच्या पुढे गेले आहे. जुलै महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या मदतीने एकूण १.४९ लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले. जीएसटी संकलनातून यापूर्वी जूनमध्ये १.४४ लाख कोटी, मे महिन्यात १.४० लाख कोटी, एप्रिलमध्ये १.६७ लाख कोटी आणि मार्चमध्ये १.४२ लाख कोटींची गंगाजळी जमा झाली होती.

ऑगस्ट मध्ये तिजोरीत १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त GST संकलन झाले. तसेच सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा महिन्यांपासून जीएसटी संकलनात वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यात,जीएसटी संकलन १.४ लाख कोटींच्या पुढे गेले आहे. जीएसटी अंतर्गत सरकारच्या महसुलात दर महिन्याला वाढ होत आहे. तसेच आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ म्हणाले होते की, ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन १.४२ ते १.४३ लाख कोटी रुपयांच्या घरात राहील. हे आकडे अर्थव्यवस्थेत तेजीचे संकेत देणारे आहेत. जीएसटी वाढण्यामागील मूळ कारण काय आहे हे देखील अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले.

GST Tax Evasion Legal Action New Rules Central Government


Previous Post

घरबसल्या पैसे कमवायचे आहेत? यापैकी कोणताही एक पर्याय निवडा

Next Post

३ मित्र… २ लाख गुंतवणूक… नवं स्टार्टअप… आज ७५ कोटींची कंपनी… अशी आहे भन्नाट यशोगाथा

Next Post

३ मित्र... २ लाख गुंतवणूक... नवं स्टार्टअप... आज ७५ कोटींची कंपनी... अशी आहे भन्नाट यशोगाथा

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group