नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार दि.11 जानेवारी, 2023 रोजी सात उमेदवारांनी दहा नामनिर्देशन अर्ज सादर केले असून आत्तापर्यंत 13 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा. प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.
आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये सुरेश भिमराव पवार, नाशिक यांनी अपक्ष व नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी या दोन पक्षातून अर्ज सादर केले आहे. अन्सारी रईस अहमद अब्दुल कादिर, धुळे व सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. रतन कचरु बनसोडे, नाशिक यानी वंचित बहूजन आघाडी पक्षातून तर शुभांगी भास्कर पाटील, धुळे भारतीय जनता पक्षातून अर्ज सादर केला आहे. ईश्वर उखा पाटील, धुळे यांनी अपक्ष व आम आदमी पार्टी या पक्षातून दोन अर्ज सादर केले आहे. सुभाष राजाराम जंगले, श्रीरामपूर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. दि.10 व 11 जानेवारी,2023 या दोन दिवसात 13 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज सादर केले आहे.
Graduate Election Candidate Applications
Vidhan Parishad Nashik Constituency