मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाल्याने अनाथांचा प्रश्न चर्चिला जात आहे. मात्र, अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी अनाथ मुलांना आपलेसे करुन मोठा आदर्श निर्माण केला आहे.
हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे बॉलीवूड विषय सर्वसामान्य जनतेला खूपच आकर्षण असते. या क्षेत्रातील मंडळी काय करतात? याची सर्वांनाच उत्सुकता असते. तसेच त्यांच्या बद्दल काही गैरसमज देखील असतात. अनेक कलाकार कोणाला काहीही मदत करत नाहीत किंवा सामाजिक कार्यात सहभागी होत नाही, असे म्हटले जाते. परंतु हे तितकेसे खरे नाही. कारण असे अनेक कलाकार आहे की, त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतलेला असतोच, परंतु इतकेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून काही मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालन पोषण करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी अशा अनाथ मुलांना आपल्या कुटुंबाचा एक भाग बनवले आहे.
बॉलीवूड आपल्या ग्लॅमर आणि लक्झरी लाइफसाठी ओळखले जाते, परंतु असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचे हृदय त्यांच्या घरासारखेच मोठे आहे. अनेक बॉलीवूड तारे तारकां यांनी उदात्त कामे केली आहेत. अनेक स्टार्स यांनी मुलांना दत्तक घेतले, ज्यांना या जगात आपले म्हणवणारे कोणीच नव्हते. केवळ अभिनेतेच नाही तर अभिनेत्रीही या उदात्त कार्यात पुढे आहेत.
सुष्मिता सेनपासून ते सनी लिओनीपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी मुलांना दत्तक घेऊन त्यांना चांगले आयुष्य तर दिले आहे तसेच त्यांना त्यांच्या आई-वडिलांचं प्रेमही दिले आहे. कोण आहेत ते बॉलिवूड स्टार्स ज्यांनी मुले दत्तक घेऊन एक आदर्श ठेवला आहे. चला तर मग जाणून घेऊ या.
सनी लिओनी
सरोगसीद्वारे सनी लिओनीला दोन जुळे मुलगे झाले आहेत पण तिने पती डॅनियलसोबत एक सुंदर मुलगीही दत्तक घेतली आहे. सनी लिओनी अनेकदा तिच्या तीन मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सुष्मिता सेन
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने दोन मुली दत्तक घेऊन एक आदर्श ठेवला आहे. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर सुष्मिताने 2000 मध्ये रेनीला दत्तक घेतले. यानंतर 2010 मध्ये तिने एलिशाला दत्तक घेतले. अशा प्रकारे, सुष्मिता दोन मुलींची आई आणि एकल पालक आहे. असे असले तरी ती तिच्या कामासोबतच आई म्हणून जबाबदारीही पार पाडते.
प्रीती झिंटा
बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा नुकतीच जुळ्या मुलांची आई झाली, पण त्याआधी तिच्या 34 व्या वाढदिवशी प्रीती झिंटाने ऋषिकेशमधील मदर मिरॅकल स्कूलमधून 34 मुलींना दत्तक घेतले. प्रिती झिंटा त्याच्या सर्व शिक्षणाची आणि चांगल्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी घेते.
रवीना टंडन
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने 2004 मध्ये लग्न केले. त्यांना मुलगी राशा आणि मुलगा रणबीर ही दोन मुले आहेत, पण त्याआधी 1995 मध्ये रवीनाने पूजा आणि छाया नावाच्या दोन मुलींना दत्तक घेतले. ती अनेकदा तिच्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते.
मंदिरा बेदी
बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीने 1991 मध्ये लग्न केले. त्यानंतर तिने 2011 मध्ये मुलगा वीरला जन्म दिला. एका मुलाखतीत मंदिराने सांगितले की, तिने 2020 मध्ये एक मुलगी दत्तक घेतली आहे. तिचे नाव तारा आहे.
सलीम खान
अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिताबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. अर्पिताला सलमानचे वडील सलीम खान यांनी दत्तक घेतले होते. त्यानंतर सर्व मुलांप्रमाणेच त्यांनी अर्पिताची खूप लाडाने काळजी घेतली. आता अर्पिता खानने आयुष शर्मासोबत लग्न केले आहे.