नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल तलवार निशाणी मिळाली ही चांगली गोष्ट आहे.
तिकडे मशाल आणि इकडे ढाल तलवार, ढाल तलवार म्हणजे डिफेन्सही आणि ऑफेंसही आहे. चिन्हं कोणतं यापेक्षा लोकांच्या मनात काय ? जनता कुणाच्या बाजूने ? हे दोन्ही पक्षात लढत झाल्यावर समोर येईल अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, ढाल तलवार इतिहासिक चिन्हं, शिवाजी महाराजांच्या काळापासून ढाल तलवार आहे.
एक चांगलं चिन्हं बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळाले, ढाल तलवार कामाला येते की मशाल कामाला येते हे लवकरच आपल्याला कळेल. पालघर साधू हत्याकांड चौकशी बाबत बोलतांना ते म्हणाले की, साधू हत्याकांडाची चौकशी ३ वर्षात काहीच झाली नाही. चौकशी डांबून , थांबवून ठेवली होती. मात्र आता आमचं सरकार, आम्ही चौकशीला गती दिली. आता लवकरच सर्व सत्य समोर येईल. MCA निवडणूकीच्या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, खेळाच्या ठिकाणी राजकारण नसलेलं बरं. त्यातून MCA ला भाजप राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर त्यात वावग काही नाही.