नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे आढळल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. घोडेवाडी शिवारात शेतीच्या बांधावार ही गांजा शेती आढळली. पोलिसांनी येथून तब्बल तब्बल ५० किलो गांजा जप्त केला आहे. घोटी पोलिसांनी शेतकरी चिमाजी घोडे याला अटक करुन गांजा जप्त केला आहे. गांजा शेतीबद्दल घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या शेतावर पोलिसांना ७० ते ८० झाडे सापडली असून त्यांची उंची ५ फुटाच्या आसपास आहे. शेतात असे अमलीपदार्थ लागवड करणे कायद्याने गुन्हा असतांना पैश्यांच्या लालसेने अशी लागवड केली जात असल्याचे समोर आले आहे.