दिसपूर (आसाम) – आसाम पोलिसांनी दुबई पोलिसांच्या सहकार्याने दिवंगत महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे चोरी झालेले महागडे घड्याळ हस्तगत करण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट करून या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, की आरोपीची ओळख पटली असून, त्याचे नाव वाजीद हुसेन आहे. पोलिसांनी हुसेनला अटक केली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, की आसाम पोलिसांनी भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या माध्यमातून दुबई पोलिसांशी समन्वय ठेवून अर्जेंटिनाचे महान फुटबॉल खेळाडू दिवंगत डिएगो मॅराडोना यांची हुबोट घड्याळ हस्तगत केली आहे. मुख्यमंत्री सरमा ट्विटरवर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिनियमांतर्गत आसाम पोलिसांनी दुबई पोलिसांशी समन्वय ठेवून ही कारवाई केली आहे. आरोपी वाजीद हुसेन याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस महासंचालक म्हणाले, की केंद्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून दुबई पोलिसांना गुन्हाबाबत प्राथमिक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून पोलिसांनी आरोपीला शिवसागर येथील घरातून अटक करण्यात आली आहे. शिवसागर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश रौशन म्हणाले, की गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही ऑपरेशन सुरू केले. तिथे आरोपी वाजीद हुसेन याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मॅरेडोन यांची घड्याळ हस्तगत केले आहे. या घड्याळाची किंमत लाखो रुपये आहे. पुढील तपास सुरू आहे.