India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तुम्ही फ्लोटिंग व्याज दराने कर्ज घेतले आहे? बँक परस्पर व्याज वाढवू शकते का? नियम काय आहे? घ्या जाणून…

India Darpan by India Darpan
January 13, 2023
in विशेष लेख
0

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
फ्लोटिंग व्याज दर, बँका आणि ग्राहक

तुम्ही फ्लोटिंग व्याज दराने कर्ज घेतले आहे? बँक परस्पर व्याज वाढवू शकते का? नियम काय आहे? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य कर्जदाराला पडलेले असतात. त्याचे योग्य उत्तर आणि मार्गदर्शन मिळत नाही. आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेऊया…

विजय सागर
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
(अखिल भारतीय ग्राहक पंचायत) मो. 9422502315

बँक ग्राहक बँकेतून घरासाठी, गाडीसाठी किंवा अन्य कारणांसाठी लोन घेतो तेव्हा बँकेबरोबर जो करारनामा(लोन agreement ) करतो ते वाचून करतोस का?
ग्राहक बँकेत लोन साठी अर्ज देतो आणि त्याला बँक एक लोन मंजूर झाले म्हणून पत्र देते (sanction leter) त्यात ज्या अटी नमूद असतात (उदा रुपये इतके कर्ज, व्याज दर इतका, इतके हप्ते, मार्जिन मनी इतके) तेच करारनाम्यात आहे का हे तपासून पाहतोस का?. फ्लोटिंग रेट व्याजदर आणि फिक्स रेट व्याजदर यातील फरक जाणून घेतोस का?

फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टमध्ये रिझर्व्ह बँक जे दर निश्चित करते (फ्लोटिंग रेफरन्स रेट FRR) त्या नुसार व्याज दर बदलत असतो हे माहीत आहे का?. बँक स्वतः हून फ्लोटिंग दर आहे म्हणजे व्याज वाढवू शकते असे नाही. आपल्याकडे रिझर्व्ह बँक FRR म्हणजेच फ्लोटिंग रेफरन्स दर निश्चित करते तेव्हाच बँक व्याज दर वाढवू शकते फक्त बँकेचे असेट लायेबिलिटी मॅनेजमेंट नुसार दर निश्चित होत नाहीत. उदाहरण म्हणून एक केसचा निकाल आपल्या माहिती साठी येथे देत आहे.(केस क्रमांक १६३/२०१९ दिल्ली स्टेट कमिशन)

श्री विष्णू बन्सल यांना ICICI बँकेने कर्जाची रक्कम रु. 30,74,100/- 8.75% व्याजाच्या फ्लोटिंग दराने मंजूर करण्यात आले होते. कर्ज करारनामा करताना त्यात समायोज्य मार्जिन उणे 1.5% होते. अशा प्रकारे कर्ज घेताना 7.25% ने घेतले गेले {8.75% अशा आगाऊ तारखेला फ्लोटिंग संदर्भ दर असल्याने वजा 1.5% सहमत मार्जिन}. सदर कर्ज 240 समान मासिक हप्त्यांमध्ये देय होते (यापुढे “EMI” म्हणून संदर्भित) रु. 24,297/- प्रत्येक महिन्याला देय होते.

बँकेने ग्राहकाला इलेक्ट्रॉनिक क्लीयरन्स सिस्टीम (यापुढे “ECS” म्हणून संदर्भित) ने बँक खात्यातून भरणे साठी फॉर्म भरून दिला होता. त्यानुसार परस्पर बँकेतून EMI जात होता. बँक ग्राहक श्री बन्सल यांना नंतर असे दिसून आले की ICICI बँक सुरुवातीला 7.25% दराने EMI आकारत होती, तथापि, नंतर बँकेने ग्राहकाला कोणतीही माहिती न देता व्याज दर परस्पर 8.75% पर्यंत वाढवला. त्यानंतर परत व्याजदर वाढवला आणि तो 12.25% पर्यंत वाढविण्यात आला. शिवाय बँक लोन परत फेडीचा कालावधी जो आधी 240 महिने होता तो 331 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आला.

ICICI बँकेच्या मनमानीमुळे ग्राहक श्री बन्सल यांनी ICICI बँकेतून घेतलेले गृहकर्ज दुसरे बँकेत ट्रान्स्फर केले आणि ICICI बँकेस अधिकचे घेतलेले रुपये 1,62,093/- परत करणे साठी नोटीस दिली. याबाबत बँकेने काहीही केले नाही म्हणून शेवटी ग्राहकाने दिल्ली राज्य आयोग यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी म्हणाले की, जरी ICICI बँकेस कर्जावरील व्याजदरात बदल करण्याचा अधिकार करारनाम्यात दिला गेला असला तरी, कर्जदार/तक्रारदाराला व्याजाच्या बदलाबाबत माहिती न देता व्याज वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार बँकेस आपोआप प्रदान होत नाही तसेच ईएमआयची संख्या वाढवणेचा अधिकार आपोआप मिळत नाही. बँकेने लेखी स्वरूपात ग्राहकाला कळवायला पाहिजे की आपले व्याजात बदल होत आहे आणि आपल्या हप्त्याचा कालावधी वाढला आहे. कारण जर बँकने असे कळवले असते तर ग्राहक म्हणून इतर बँकेत जाऊन कर्ज घेऊन ग्राहकाचे पैसे वाचले असते. त्यामुळे असा बदल करण्यापूर्वी कर्जदाराला संधी देणे आवश्यक आहे.

बँकेने ग्राहक आयोगात आपले म्हणणे मांडले त्यात असे कथित केले की बँकेने न्यूज पेपर मधे माहिती दिली होती की बँकेचे व्याजदर बदलले आहेत. ग्राहक आयोगाने निर्णय देताना निरीक्षण नोंदवले की *व्याज दर बदलण्याचा किंवा ईएमआयची संख्या बदलण्याचा अधिकार बँकेस होता, तथापि, तक्रारदाराला व्याज दर वाढवला गेला होता किंवा त्याबद्दल कधीही माहिती दिली गेली नाही. ईएमआयची संख्या बदलली आहे याचीही माहिती दिली नाही. तक्रारदाराला खाते बंद करण्याचा किंवा खाते शिफ्ट करण्याचा पर्याय देण्यासाठी वरील माहिती तक्रारदाराला उघड करणे बँकेचे कर्तव्य होते. परिणामी, कर्जदार/तक्रारदाराची संमती न घेता बँकेने व्याजदरात केलेली वाढ किंवा घट ही अनुचित व्यापार प्रथा आहे असे आमचे मत आहे.*

ग्राहक आयोगाने खालील प्रमाणे आदेश दिले
१) बँकेने रु १६२०९३/- हे ६% व्याजाने तक्रार दाखल झालेचे तारखे पासून ३० जून २०२१ पर्यंत द्यावेत. ३० जून २०२१ पर्यंत पैसे परत दिले नाही तर पुढे ९% दराने द्यावेत.
२) ग्राहकाला रुपये ५०००० मानसिक त्रासापोटी द्यावेत.
३) केसच्या खर्च पोटी रु. ५००००/- द्यावेत.
तेव्हा ग्राहक राजा तू कर्जदार आहेस म्हणजे तू बँकेची मनमानी सहन करायची असे नाही.
आपल्याही बँकेत जाऊन आपले व्याज दर वाढवले आहेत का हे तपासून घ्या! आपले हप्ते परस्पर वाढवले आहेत का हेही तपासा!
आपले कष्टाचे पैसे गेले असतील तर ते नक्की परत मिळतील त्यासाठी साजग हो, लिहिता हो, आपल्यावर झालेला अन्याय अजिबात सहन करू नकोस. बँक कितीही मोठी असली तरी ग्राहक आहेत म्हणून बँक आहे हे लक्षात ठेव.

आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
श्रीमती अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्रीमती सई बेहरे 9890099982

श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286, श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
*नागपूर*: श्री विलास ठोसर 9766550868
*परभणी*’: डॉक्टर विलास मोरे 8180052500

Floating Interest Rate Bank Rules by Vijay Sagar
Jago Grahak Jago Consumer Banking Finance Special Article Column Loan


Previous Post

पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचा शुभारंभ, एवढे आहे तिकीट, तब्बल २ वर्षांचे बुकींग फुल्ल (Video)

Next Post

आता पुन्हा चार दिवस बँका बंद! कर्मचारी संघटनांचा इशारा

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

आता पुन्हा चार दिवस बँका बंद! कर्मचारी संघटनांचा इशारा

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group