India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राला कसा प्रतिसाद आहे… किती वाळू विक्री झाली… महसूलमंत्री म्हणाले

India Darpan by India Darpan
May 15, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील बहुतेक जिल्ह्यात वाळू विक्री केंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. सामान्य नागरिकांना घरकुलासाठी वाळूची उपलब्धता होत आहे. सर्व अडचणी दूर झाल्याने काही दिवसात वाळू धोरणाची अंमलबजावणी जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल. असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राच्या कामकाजाचा महसूलमंत्र्यांनी आज श्रीरामपूर येथे आढावा घेतला. त्यावेळी महसूलमंत्री श्री.विखे -पाटील बोलत होते. श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी किरण सामंत, महसूली कर्मचारी, तलाठी आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, नायगाव वाळू केंद्रावर पंधरा हजार ब्रॉस वाळू उपलब्ध झाली असून आतापर्यत २३७ ब्रॉस वाळू घरकुलांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरूवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या अधिकारी कर्मचारी यांच्या दृष्टीने नवा विषय होता. परंतू आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. या धोरणासाठी तयार केलेले अॅप्स आणि टोल फ्री क्रमांकही सुरू झाले असून, धोरणाच्या अंमलबजावणीत येत्या पंधरा दिवसात अधिक सुसूत्रता येईल.

नागरिकांचा या धोरणाला विरोध नाही. यापूर्वी वाळू माफियांकडून गावाला त्रास झाला. या व्यवसायाने गुन्हेगारी वाढली, पुन्हा त्रास नको हीच नागरिकांची भावना आहे. जनतेच्या भावनेच्या विरोधात जावून शासन काही करणार नाही. परंतू अमळनेर येथील ग्रामस्थांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेपही झाला. हे सुध्दा दुर्लक्षित करता येणार नाही. या ग्रामस्थांशी मी स्वत: जावून चर्चा करणार आहे. या परिसरात वाळू केंद्र झाले. नाहीतर या भागातील इतर नागरिकांना अधिक दूरवरून वाळू आणावी लागेल. त्यांचा वाहतूक खर्चही वाढेल ही दुसरी बाजू सुध्दा विचारात घेण्याची गरज असल्याचेही महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आता कायद्याच्या चौकटीत धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. आता जलसंपदा विभागालाही यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आल्याने नव्या वाळू धोरणातून काहीतरी चांगले घडविण्याचे प्रयत्न जनतेच्या मनातील सरकारचे आहेत. जनतेच्या हितासाठी हे धोरण तयार केले असल्याने जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल. असा विश्वास महसूलमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

First Sand Auction Centre Response Revenue Minister


Previous Post

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार… नाशिकच्या वडाळागावातील प्रकार

Next Post

सुवर्णसंधी… अवघ्या २० रुपयात मिळणार २ लाखांचा विमा…. असा घेता येणार या सरकारी योजनेचा लाभ

Next Post

सुवर्णसंधी... अवघ्या २० रुपयात मिळणार २ लाखांचा विमा.... असा घेता येणार या सरकारी योजनेचा लाभ

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group