India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सणासुदीत बँकांच्याही तगड्या ऑफर्स; डेबिट आणि क्रेडिट कार्डवर या आहेत सवलत

India Darpan by India Darpan
September 30, 2022
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी असा सणासुदीचा काळ सध्या सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन विविध राष्ट्रीय आणि खासगी बँकांनी ग्राहकांसाठी असंख्य ऑफर्स आणल्या आहेत. ऑनलाईन खरेदीसह डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरावर सवलत देण्यात येत आहे. फेस्टिवल लोनद्वारेही ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे होणारे व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होत आहेत. आता सणासुदीला सुरुवात झाली असून, ग्राहकांना खरेदीकडे वळवण्यासाठी ई-कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आणि बँका डिस्काउंट, कॅशबॅक सोबतच अनेक ॲाफर्स देत आहेत. त्यामुळे खरेदीची मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे बँका आणि वित्तीय संस्था ग्राहकांना विशेष कर्ज देऊ करत आहेत.

व्याजदर घटवला
युनियन बँक ॲाफ इंडियासह पंजाब नॅशनल बँकेनेही प्रत्येक प्रकारच्या लोनचे प्रक्रिया शुल्क, कागदपत्रे शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बँक ॲाफ इंडियानेही प्रत्येक प्रकारच्या कर्जावर आपला व्याजदर कमी केला आहे. तसेच आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसीसह अनेक बँकांनी गृह कर्ज, वाहन कर्जाचे व्याजदर कमी करण्यासह ईएमआयवर सवलत आणि प्रोसेसिंग शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रेडिट-डेबिट कार्ड
क्रेडिट-डेबिट कार्डने व्यवहार केल्यास मोठी सवलत आणि कॅशबॅक ॲाफर देण्यात येत आहेत. तसेच बँकेने कार लोन, पर्सनल लोन, वाहन आणि गोल्ड लोनवर घेण्यात येणारे प्रोसेसिंग शुल्क माफ केले आहे. कार्डने पेमेंट केल्यानंतर सणासुदीच्या सवलतीच्या अंतर्गत ग्राहकांना वेगवेगळ्या खरेदीवर सुमारे २२ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट म्हणजे सूट देण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात बँका होम लोन खरेदीदारांसाठी मोफत सोन्याची नाणी आणि यासाख्या गोष्टी ऑफर करतात.

कॅशबॅक ॲाफर :
विविध प्रकारचे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डला ईएमआयवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ॲाफरही देत आहेत. अनेक कंपन्यांनी सेल सुरू केला असून, आतापासूनच मोबाइलची प्रचंड विक्री होते आहे. चार दिवसांमध्येच २४,५०० कोटी रुपयांचा फायदा कंपन्यांना झाला आहे. विविध संकेतस्थळांवरील मोबाईल, गॅझेट तसेच इतर खरेदी डेबिट, क्रेडिट कार्डने केल्यास २५ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, केवळ ११०० रुपयांच्या प्रोसेसिंग शुल्कासह गृहकर्ज मंजुरी मिळते.

कर्जाचे फायदे :
सणासुदीच्या कर्जाचे फायदे प्रत्येक बँकेत वेगळे असतात. सुमारे ४० लाख रुपयांपर्यंतच्या पर्सनल लोनसाठी १०.५० टक्के व्याजदर, ७.९० टक्के व्याज दराने वाहन कर्ज तसेच कोणतेही अन्य शुल्क लागणार नाही, त्याशिवाय सुमारे ५० लाख रुपयांपर्यंतचे टॉप अप लोन स्वस्त व्याजदरात उपलब्ध, कोणतीही वस्तू गहाण न ठेवता प्रोसेसिंग शुल्कात ५० टक्के सवलतीत व्यावसायिक कर्ज, प्रोसेसिंग शुल्कात ५० टक्के डिस्काउंटसह गोल्ड लोनसारख्या सुविधाही बँकेकडून देण्यात येत आहेत.

 सावधगिरी बाळगा :
नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सणाला बँक ग्राहकांसाठी विशेष लोण साठीची ऑफर देतात, काही बँक कर्जाची रक्कम मोठी असल्यास ईएमआय सवलत देतात क्रेडिट कार्डचे वापरामुळे एम आय मिळणे सोपे झाले आहे. तसेच सणासुदीचा काळ असाही असतो, तेव्हा बँका प्रक्रिया शुल्क, सवलतीचे शुल्क, कमी व्याजदर इत्यादींच्या स्वरूपात त्यांच्या विशेष कर्ज ऑफर देतात. कर्ज घेताना एखाद्याने नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण सणाच्या कर्जाची कल्पना ही सणासुदीच्या काळात अधिक खर्च करण्यास प्रोत्साहित करणे आहे. त्याच वेळी आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी पुरेसे पैसे नसतात, तेव्हाच कर्ज घेणे हाच पर्याय आहे.

Festival Season Banks Bumper Offers


Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची अशी आहेत वैशिष्ट्ये

Next Post

वाढदिवसाची अनोखी भेट! संगीतकार संजय गीते यांनी कवी देवीदास चौधरी यांना दिला हा अनमोल नजराणा (बघा व्हिडिओ)

Next Post

वाढदिवसाची अनोखी भेट! संगीतकार संजय गीते यांनी कवी देवीदास चौधरी यांना दिला हा अनमोल नजराणा (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरु, कुणाचे पारडे जड? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील?

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group