India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; २९ कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्न पदार्थ साठा जप्त

India Darpan by India Darpan
November 6, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांचा दर्जा खात्रीशीर रहावा तसेच ग्राहकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावे यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेंतर्गत टीटीसी इंडस्ट्रियल एरिया येथे धाड टाकून परदेशातून आयात करण्यात आलेला २९ कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्न पदार्थ साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली आहे.

नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याकरिता अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न आस्थापनांच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीचे काम सुरू आहे. अन्न आस्थापना व कोल्ड स्टोरेज व गोदामांमध्ये अचानक भेट देऊन धाड टाकण्यात आली. या दरम्यान २९ कोटी रूपयांची आयात करण्यात आलेल्या अन्न पदार्थांची जप्ती करण्यात आली आहे. यामध्ये मे. सावला फूड्स ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रायवेट लिमिटेड डी-३९, व सावला फूड्स अॅड कोल्ड स्टोरेज प्रायवेट लिमिटेड डी-५१४, टीटीसी इंडस्ट्रीअल एरिया, MIDC तुर्भे, या पेढ्यांमधून अन्न पदार्थाचे एकूण ३५ नमुने विश्लेषणासाठी घेऊन त्यांचा उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे.

साठवणूक केलेल्या काही अन्न पदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्याने व कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने तसेच अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाल्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन संबंधित अन्न पदार्थांचा उर्वरित साठा जप्त करून परवाना धारकांच्या ताब्यात पुढील आदेश होईपर्यंत ठेवण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेले सर्व अन्न नमुने हे अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा, मुंबई येथे विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेले असून विश्लेषण अहवाल प्रथम प्राधान्याने देण्याबाबत कळविण्यात आले आहे. तपासणी अहवालामध्ये आढळून आलेल्या गंभीर त्रुटींबाबत तपासणी अहवाल संबंधित सहायक आयुक्त (अन्न), ठाणे यांना पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहेत.

FDA Action Mumbai 29 Crore adulteration Food Seized


Previous Post

T20 विश्वचषक- भारताचा सामना आज झिम्बाब्वे सोबत; विजय किंवा पराजय झाला तर काय होईल?

Next Post

५० इंचांचा स्मार्ट टीव्ही अवघ्या १५,९९९ रुपयात

Next Post

५० इंचांचा स्मार्ट टीव्ही अवघ्या १५,९९९ रुपयात

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group