India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; वाडीवऱ्हे येथे दोन कंटेरनमधून १ कोटी ९५ लाखाचा गुटखा जप्त

India Darpan by India Darpan
December 29, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत वाडीवऱ्हे येथे दोन कंटेरनमधून १ कोटी ९५ लाख ८७ हजाराचा गुटखा जप्त केला. गुप्त माहितीच्या अनुषंगे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी यांनी पाठलाग करून व सापळा रचून ही कारवाई केली. गुरुनानक ढाबा परिसरात दोन मोठे कंटेनर पकडून झाडाझडती केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला.

यापैकी एका वाहनातून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलने त्याचा एक किलोमीटर पर्यंत पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. वाहन क्र. RJ 06 GB 5203 या कंटेनर मधून SHK Premium या गुटक्याचा एकूण १ कोटी ५० लाख ५४ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच वाहन क्र. RJ 09 GB 0472 या कंटेनर मधून SHK Premium, Safar व 4K (STAR) या ब्रँडचा एकूण ४५ लाख ३३ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे दोन्ही कंटेनर मिळून एकूण १ कोटी ९५ लाख ८७ हजार रुपयाचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा व अंदाजे ३० लाख किमतीचे दोन कंटेनर अन्न औषध प्रशासनाने जप्त करून वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात पुढिल कारवाईसाठी दिले आहेत. तसेच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 328, 272,273,188 व अन्न सुरक्षा मानदे कायद्यातर्गत एफआयआरची नोंद करण्याची प्रकीया सुरू आहे. पुढिल तपास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे करीत आहे. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे, अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त गणेश परळीकर, सहायक आयुक्त उदय लोहकरे, मनिष सानप यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार व अमित रासकर यांनी केलेली आहे.


Previous Post

नववर्षाच्या प्रारंभीच असा आहे हवामान अंदाज; थंडी कमी असेल की अधिक?

Next Post

अखेर पश्चिम घाटाबाबत राज्य सरकारने घेतला हा निर्णय; २१३३ गावांचे काय होणार?

Next Post

अखेर पश्चिम घाटाबाबत राज्य सरकारने घेतला हा निर्णय; २१३३ गावांचे काय होणार?

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group