इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुम्हालाही रील्स बनवण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही रील्सच्या माध्यमातून फेसबुकवरूनही कमाई करू शकता. रील्सद्वारे तुम्ही थोडेथोडके नाही तर दरमहा 3 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकता. फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या मेटाने घोषणा केली आहे की, फेसबुक रीलमध्ये मूळ सामग्री तयार करणाऱ्या निर्मात्यांना दरमहा 3.07 लाख रुपये दिले जातील.
रील्स निर्मात्यांना हे पेमेंट डॉलरमध्ये दिले जाईल, जे रीलवरील व्ह्यूअर्स (दर्शक) संख्येवर अवलंबून असेल. Facebook Reels वर दरमहा 4 हजार डॉलर पर्यंत कमावण्याची संधी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जर आपण या डॉलरचे रुपांतर भारतीय रुपयात केले तर ही रक्कम सुमारे 3.07 लाख रुपये एवढी होते.
मेटाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही Facebook वर “चॅलेंजेस” सादर करत आहोत, जे निर्मात्यांना सामग्रीद्वारे कमाई करण्यास मदत करते. याद्वारे, एका महिन्यात 4 हजार डॉलर पर्यंत कमाई करता येते,” कंपनीने सांगितले की या कार्यक्रमाअंतर्गत काही आव्हाने निश्चित करण्यात आली आहेत आणि प्रत्येक आव्हानावर निर्माते पैसे कमावतील.
उदाहरणार्थ – पहिल्या स्तरावर, जेव्हा निर्मात्यांच्या 5 रील्सपैकी प्रत्येकाने 100 दर्शकसंख्या ओलांडली, तेव्हा तुम्हाला 20 डॉलर मिळतील. “जेव्हा निर्मात्याने एखादे आव्हान पूर्ण केले, तेव्हा पुढील आव्हान अनलॉक केले जाते. 5 रील आव्हान पूर्ण केल्यानंतर, निर्मात्यांना 100 डॉलर मिळवून 20 रीलवर 500 दर्शक पूर्ण करण्याचे आव्हान असेल. त्यानंतर मासिक पूर्ण करणे तुम्हाला 0 पासून सुरू करावे लागेल. दरम्यान, फेसबुकच्या या निर्णयामुळे अनेकांना पैसे कमावण्याची मोठी संधी मिळणार आहे.