India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ईडीच्या छाप्यांनंतर हसन मुश्रीफ यांनी दिली ही प्रतिक्रीया (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
January 11, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सकाळीच छापे टाकले आहेत. मुश्रीफ यांच्या निवासस्थान, साखर कारखाना, कार्यालय येथे ईडी आणि आयकरचे पथक दाखल झाले असून ते तपासणी करीत आहेत. यासंदर्भात मुश्रीफ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

ईडी आणि आयकरचे पथकाची छापेमारी सुरू झाल्यानंतर माजी मंत्री मुश्रीफ यांनी एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी काही कामानिमित्त बाहेर आहे. आज सकाळपासून माझे घर, कारखाना व नातेवाईकांच्या घरावर छापे सुरू आहेत. माझ्या मुलीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी शांतता राखावी. कागल बंदची घोषणा केली आहे ती कृपया मागे घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

मी काही कामानिमित्त बाहेर आहे. आज सकाळपासून माझे घर, कारखाना व नातेवाईकांच्या घरावर छापे सुरू आहेत. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी शांतता राखावी. कागल बंदची घोषणा केली आहे ती कृपया मागे घ्यावी. @mrhasanmushrif pic.twitter.com/glnEGVGlzc

— NCP (@NCPspeaks) January 11, 2023

ईडी आणि आयकर विभागाचे २० अधिकारी त्यांच्या घरावर धडकले. ही बातमी वाऱ्यासाठी संपूर्ण राज्यात पसरली. आपल्या पक्षातील नेत्याच्या घरावर छापे पडल्याचे कळताच राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनाही घाम फुटला. सकाळी साडेसहापासून मुश्रीफ यांच्या घराची झडती घ्यायला सुरुवात झाली. सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. आणि यावेळी कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून बाहेर सुरक्षा जवानांचा बंदोबस्तही उभा करण्यात आला. घरातील कुणालाही बाहेर पडण्यास परवानगी नव्हती.

प्रकरण काय आहे?
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या प्रकरणात हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि आयकर विभागाने छापे मारले. या बातमीनंतर केवळ राष्ट्रवादी पक्षच नव्हे तर कोल्हापुरातही खळबळ उडाली आहे. मुश्रीफ यांच्यावर शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे.

सोमय्या भेटले आणि…
विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक दिवस आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे आणि लगेच दुसऱ्या दिवशी हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा मारणे, या घटनाक्रमाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे. यापूर्वी हसन मुश्रीफ यांच्यामुळे अनेक नेत्यांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. @Jayant_R_Patil यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. pic.twitter.com/G2CbtZFV1i

— NCP (@NCPspeaks) January 11, 2023

१०० कोटी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची वेळ आहे का, अशी शंका व्यक्त होत आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप होता, तर हसन मुश्रीफ यांच्यावर शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यामुळे शंभर कोटींचा आकडा राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.

Ex Minister Hasan Mushrif Reaction After ED Raid


Previous Post

आता ‘राष्ट्रवादी’चे नेते हसन मुश्रीफ रडारवर! निवासस्थानी ईडी आणि आयकरची छापेमारी

Next Post

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस; ही आहे नाराजी

Next Post

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस; ही आहे नाराजी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group