नाशिक – कोरोना संकटामुळे काही कुटुंबांमध्ये विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. काही कुटुंबांमध्ये पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मुले अनाथ झाली आहेत. अशा अनाथ विद्यार्थ्यांसाठी माजी आयपीएस अधिकारी डॉ. प्रताप दिघावकर यांनी अभिनव योजना आणली आहे. नाशिक जिल्ह्यातील अशा या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यासाठी ९७७३१४९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.