देहरादून – “कोरोना व्हायरस हा देखील एक प्राणी असून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. जर आपण त्याच्या मागे लागलो तर तोही पुन्हा पुन्हा आपले रूप बदलत आहे”, असे वादग्रस्त विधान माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते त्रिवेंद्रसिंग रावत यांनी केले आहे. कोरोना विषाणूसंदर्भात माजी मुख्यमंत्र्यांनी केलेले हे विधान सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शिवाय या विधानावरुन त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये त्रिवेंद्र सांगत आहे की, कोरोना व्हायरस एक प्राणी आहे आणि आपण स्वतःला सर्वात बुद्धिमान समजतो. पण त्या जीवाला जगायचे आहे. त्याचाही हक्क आहे. आम्ही त्याच्या मागे लागलो आहोत. त्याला पळून जायचे आहे. म्हणून फॉर्म बदलत असून बहुरूपमय झाला आहे. म्हणूनच, आपल्याला व्हायरसपासून अंतर ठेवावे लागेल. माजी मुख्यमंत्र्यांचे हे विधान सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅपवर खूप व्हायरल होत आहे. लोक टीका देखील करीत आहेत. परंतु त्रिवेंद्र समर्थकांचे म्हणणे आहे की, माजी मुख्यमंत्र्यांनी लोकांना कोरोना विषाणूपासून वाचण्याचा इशारा दिला आहे.
आम आदमी पक्षाचे प्रभारी दिनेश मोहनिया टिका करताना म्हणाले की, जर मंत्री तीरथसिंग रावत यांना परस्परविरोधी वक्तव्यातून मोकळा वेळ मिळाला तर राज्यात कोविडच्या भीषण घटनेवरही नजर टाकावी. तसेच त्यांना तोडगा काढण्यास बराच वेळ लागेल. आता तरी राज्यातील लोकांना कोरोनापासून वाचवावे.
दरम्यान, रावत यांच्या या विधानामुळे ते सोशल मिडियात चांगलेच ट्रोल झाले आहेत. त्यांच्यावर टीका टिपण्णीसह त्यांची खिल्लीही उडवली जात आहे. त्यामुळे ते सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
रावत यांच्या विधानानानंतर सोशल मिडियावर व्हायरल झालेले व्यंगचित्र असे