इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – निसर्गाचा लहरीपणा नेमका कसा असतो याचा प्रत्यय सध्या इथिओपिया आणि सोमालिया या अफ्रिकन देशांमध्ये येत आहे. तेथे अतिवृष्टी आणि पुराने कहर केला आहे. या वर्षी अतिवृष्टीमुळे आलेल्या अचानक पुरामुळे डझनभर लोकांचा मृत्यू झाला आणि तीन लाख लोक प्रभावित झाले आहे. याठिकाणी सुमारे तीन वर्षे दुष्काळ असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रॉप मॉनिटरने अहवाल दिला आहे की, मार्चच्या पहिल्या २५ दिवसांत इथिओपियाच्या काही भागात ५ ते १० सेमी (२ ते ४ इंच) पावसाची नोंद झाली आहे. यावेळी तेथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
एका हवामान शास्त्रज्ञाने सांगितले की केनियामध्ये पाऊस जास्त काळ टिकतो. नंतर इथिओपिया आणि सोमालियामध्ये पाऊस पडतो. यंदा पावसाला एकाच वेळी सुरुवात झाली. मार्चच्या शेवटच्या दोन आठवड्यात तिन्ही देशांत एवढा पाऊस झाला की पूरस्थिती निर्माण झाली.
इथिओपियामध्ये मुसळधार पावसामुळे शबेले आणि जुबा नद्या ओसंडून वाहत आहेत. युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेयर्स (UNOCHA) नुसार, दक्षिण सोमालिया आणि पूर्व इथिओपियामधील दोन नद्यांवरील धरणे फुटल्याने घरे, शाळा आणि आरोग्य सुविधांचे आतोनात नुकसान झाले आहे.
इथिओपिया आणि सोमालिया या देशांमध्ये गेली सलग तीन वर्षे इतिहासातील सर्वात भीषण दुष्काळ पाहिला आहे. इथिओपिया आणि सोमालियामध्ये २०२० पासून गेल्या वर्षीपर्यंत पाऊस पडला नाही. यामुळे सुमारे १.४ दशलक्ष लोकांनी सोमालिया सोडले, तर ३.८ दशलक्ष प्राणी दुष्काळामुळे मरण पावले. शबेले-जुबा नदीच्या खोऱ्यात १९८१ पासून या वर्षी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इथिओपिया आणि सोमालियामध्ये पावसामुळे १ हजार हेक्टरपेक्षा जास्त पीक नष्ट झाले. शेती हा या देशांतील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. या भागातील बहुतांश पिके पावसावर अवलंबून आहेत.
Ethiopia Somalia Drought Heavy Rain Flood