नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉलेजरोड भागात राहणा-या एकाने घरगुती मिटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्यामुळे गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सजित नासिककर यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन प्रविण मधुकर खर्डे (रा. साई अनुसया अपा. मान्यवर चौक, कॉलेजरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज चोरी विरोधात वीज कंपनीने कारवाईचा बडगा उगारला आहे. या पार्श्वभूमिवर सर्वत्र तपासणी सुरू असून, कॉलेजरोड भागात पथकाच्या वतीने सुरू असलेल्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार सुरू आला आहे. संशयिताने आपल्या घरगुती मिटरच्या मेन फेजमध्ये वायर टाकून मिटर स्लो केल्याचे समोर आले आहे. मिटरमध्ये फेरफार करीत बेकायदा रिडींग कमी येईल यासाठी ५१ टक्के मिटर स्लो केल्याचे पुढे आले असून याप्रकरणी पोलिस दप्तरी वीज अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक पगार करीत आहेत.