नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियन सायकॅट्रिक सोसायटीची पश्चिम विभागीय परिषद २८ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत डोना पाउला गोवा येथे पार पडली. या परिषदेमध्ये नाशिक येथील जेष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उमेश नागापूरकर यांनी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्विकारली. महाराष्ट्र ,गुजरात, गोवा या राज्यातील ३०० पेक्षा अधिक मानसोपचारतज्ज्ञांनी या परिषदेमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
डॉ धनंजय आष्टुरकर, पुणे यांची सचिव म्हणून पुढील दोन वर्षांकरिता एकमताने फेरनिवड करण्यात आली. मुंबई येथील ल डॉ. नीना सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गोवा येथील डॉ. रविंद्र अग्रवाल यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. नाशिक येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांची कार्यकारिणी सदस्य पदी पुढील 3 वर्षांकरिता निवड करण्यात आली .
पदग्रहण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिषदेत संबोधित करताना ,डॉ.उमेश नागापूरकर म्हणाले की समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येतील,तसेच २०१७ चा मानसिक आरोग्य कायदा ,जो केंद्र सरकारने लागू केलेला आहे, त्याची महाराष्ट्र ,गुजरात ,गोवा या राज्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करून मानसोपचार तज्ञांना जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी येत्या एक वर्षात प्रयत्न करण्यात येतील .या दोन्ही उद्देशांमुळे मानसोपचार तज्ञांना उपचारांसाठी पोषक वातावरण मिळून समाजातील मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना अधिक चांगल्या प्रकारे उपचार आणि सेवा देता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मानसोपचार तज्ञांसाठी सोशल सेक्युरिटी स्कीमचा देखील मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात येणार असून त्याद्वारे मानसोपचार तज्ञांमधील एकता अधिक बळकट करण्यात येईल असाही विश्वास यावेळी नवीन निवड झालेल्या कार्यकारिणी तर्फे व्यक्त करण्यात आला.
परिषदेमध्ये या व्यतिरिक्त विविध शास्त्रीय विषयांवर चर्चा करण्यात आली .परिसंवाद आयोजित करण्यात आला.तसेच वैदयकिय महाविदयलयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी डॉक्टरासाठी प्रशनमंजुषाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
त्यात कोल्हापूर, पुणे, मुंबई , गोवा, नागपूर, इ. विविध शहरातूंन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्यात आला. परीषदेच्या यशस्वितेसाठी डॉक्टर अनिल राणे , डॉक्टर आशिष श्रीवास्तव तसेच गोवा सायकॅट्रीक असोसिए शनच्या इतर सर्व सदस्या कडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले.