पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील खानदेश मराठा मित्र मंडळाच्या वतीने दिनांक १ मे २०२२ रोजी नाशिक येथील सेवानिवृत्त प्राचार्य व विज्ञान लेखक प्राचार्य डॉ. किशोर पवार यांना समाज गौरव या पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या विज्ञान प्रसार व अंधश्रद्धा निर्मूलन कार्याबद्दल देण्यात आला. या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री राजेश पाटील, खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री गुलाबराव पाटील उपाध्यक्ष श्री मधुकर पगार व मंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दर वर्षी हा पुरस्कार सोहळा घेतला जातो परंतु करोना काळात मात्र हा कार्यक्रम आयोजित करता आला नाही. समाजात व मंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी डॉ. उषा सावंत ,श्री राजेश पाटील, सौ प्रतिभा पाटील, डॉ .कुंदन पाटील ,श्री संदीप देवरे व प्रदीप शिंदे हे पुरस्काराचे मानकरी ठरले. या कार्यक्रमासाठी खासदार बारणे व माजी महापौर श्रीमती मोरे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपाध्यक्ष श्री पगारे यांनी आभार मानले.