India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तुम्ही डॉमिनोज पिझ्झाचे शौकीन आहात? मग ही बातमी वाचाच

India Darpan by India Darpan
July 25, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न, वस्त्र, निवारा या मानवाचे तीन मूलभूत गरजा आहेत, त्यापैकी अन्न हे दररोज तयार करावे लागते. त्यामुळे बहुतांश घरामध्ये गृहिणींना जेवण बनवावे लागते. परंतु अलीकडच्या काळात घरी जेवण करण्याऐवजी बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सुमारे पाच सात वर्षांपासून घरीच ऑनलाईन पद्धतीने जेवण मागविण्याचेही प्रथा वाढली आहे. त्यातच पिझ्झा सारख्या पदार्थांना तर ऑनलाईन पद्धतीने प्रचंड मागणी असते. विशेषतः तरुणांमध्ये ही प्रथा दिसून येते, मात्र यापुढे ऑनलाईन पद्धतीने पिझ्झा मागविणे शक्य होणार नाही. डॉमिनोज या विख्यात पिझ्झा फ्रॅंचायझीने स्विगी, झोमॅटोवरून फूड डिलीव्हरी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच तुम्हाला झोमॅटो आणि स्विगीवरून डॉमिनोजचा पिझ्झा ऑर्डर करता येणार नाही.

सध्या देशातील ऑनलाईन फूड डिलीव्हरी ॲप्सपैकी असणाऱ्या झोमॅटो आणि स्विगीविरोधात कंपनीने एवढा मोठा निर्णय का घेतला असेल, याचीच चर्चा सुरु आहे. या कंपन्यांचे वाढते कमिशन रेट हे त्यामागचं महत्वाचं कारण असल्याचे बोलले जात आहे. ज्युबिलंट फूडवर्क्स या कंपनीतर्फे भारतात ‘डॉमिनोज’ पिझ्झा आणि ‘डंकिन्स’ डोनट्सच्या आऊटलेट्सची साखळी चालवण्यात येते. त्यामध्ये डॉमिनोजची सुमारे 1570 आऊटलेट्स आहेत.

सुमारे दोन वर्षापूर्वी डॉमिनोज पिझ्झा इंडियाने रेग्युलर साइज पिझ्झाच्या एव्हरीडे वॅल्यू प्राइसस लॉंचची घोषणा केली. एव्हरीडे वॅल्यू प्राइसमध्ये ग्राहकांना ९९ रुपयांच्या आकर्षक दरात रेग्युलर पिझ्झा खरेदी करता येणार आहे. ही ऑफर मीडियम साइज पिझ्झवर होती. जी ३-४ जणांच्या मोठ्या ग्रुपला केंद्रीत ठेवून करण्यात आली.

दरम्यान, वाढत्या कमिशनमुळे, डॉमिनोजने त्यांचा बिझनेस ऑनलाइन प्लॅटफॉर्मऐवजी इन-हाऊस ऑर्डरिंग सिस्टीमद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पत्रात लिहीलेल्या माहितीनुसार, डॉमिनोजच्या भारतातील एकूण व्यापारापैकी 26 ते 27 टक्के व्यापार ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झाला आहे. ज्यामध्ये कंपनीचे स्वत:चे (डॉमिनोज) मोबाईल ॲप आणि वेबसाईटचा समावेश आहे.

झोमॅटो, स्विगी सारखी इतर डिलीव्हरी ॲप्स 20 ते 30 टक्के कमिशनची मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप असून ते अयोग्य आहे, कंपनीने म्हटले आहे. वाढत्या कमिशनच्या पार्श्वभूमीवर ज्युबिलंट कंपनी स्वत:ची प्रॉडक्ट्स आपल्याच डिलीव्हरी प्लॅटफॉर्मवर ट्रान्स्फर करण्याच्या विचारात असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. सध्या ऑलाइन डिलीव्हरी ॲप्स अनेक आकर्षक डिस्काऊंट देत असल्याने त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.

स्विगी व झोमॅटो त्यातील अग्रगण्य नावे आहेत. मात्र त्यांच्यावर कमिशनची मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप होत आहे. एवढे कमिशन घेणे व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य आहे, असे अनेक रेस्टॉरंट उद्योजकांचेही म्हणणे आहे. या दोन्ही फूड डिलीव्हरी ॲप्सच्या गैरव्यवहारांबद्दल नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने एप्रिल महिन्यात चौकशी सुरू केली होती.

डिलीव्हरी ॲप्सनी कमीशनमध्ये वाढ केल्यास रेस्टॉरंटचे मालक आणि उद्योजकांचा नफा कमी होईल, अशी चिंता एका रेस्टॉरंट उद्योजकाने व्यक्त केली. त्याच पार्श्वभूमीवर डॉमिनोजने स्विगी, झोमॅटोवरून फूड डिलीव्हरी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच एकीकडे तरुण बेरोजगारीशी झुंज देत आहेत, तर दुसरीकडे फूड डिलिव्हरी कंपन्या आणि ई-कॉमर्स कंपन्यांना कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता आहे.

ऑनलाइन वितरण प्लॅटफॉर्मसाठी डिलिव्हरी कर्मचार्‍यांची तीव्र कमतरता ही एक प्रमुख चिंतेची बाब बनली आहे. कामगारांच्या कमतरतेमुळे या कंपन्या वाढत्या मागणीची पूर्तता करू शकत नाहीत. डिलिव्हरी कंपन्यांशी संबंधित अनेक अधिकार्‍यांनी सांगितले की, Zomato, Swiggy आणि Zepto यासह अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये डिलिव्हरीची मुदत वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि महागाई यांच्याशी कामगार संघर्ष करत असल्याने हे घडत आहे.

सध्या आयपीएल क्रिकेट, पावसाळा आणि सणासुदीच्या सीझनमुळे फूड मार्केटप्लेस आणि इन्स्टामार्ट या दोन्हींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे स्विगी (Zomato) आणि झोमॅटोसारख्या (Swiggy) ऑनलाइन कंपन्या ग्राहकांना जेवण, खाद्यपदार्थ मागण्याची प्रथा वाढली आहे . मात्र, ग्राहकांना आता ऑनलाइन जेवण मागवणे महाग पडणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्विगी तसेच झोमॅटोने डिलीव्हरी चार्जेसच्या नावाखाली जास्त पैसे वसूल करत आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

Dominoz Pizza Online Food Delivery Big Decision Swiggy Zomato


Previous Post

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

Next Post

देशात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post
संग्रहित फोटो

देशात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group