इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महिला सरकारी रुग्णालयात चक्क नवजात बाळांची अदलाबदली करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. तब्बल ५६ दिवसांनी याचा उलगडा झाला आहे. डीएनए चाचणीद्वारे ही बाब स्पष्ट झाली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील जिल्हा महिला रुग्णालयात हा प्रकार घडला होता.
रुग्णालयाच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल झालेल्या दोन नवजात बालकांच्या कथित अदलाबदलीबाबत केलेल्या डीएनए चाचणीचा अहवाल पोलिसांना मिळाला. पोलिसांनी न्यायालयाच्या बाल कल्याण समितीसमोर अहवाल सादर केला. जैदपूर परिसरातील प्रसूत झालेल्या नीलम या महिलेला तिचे मुल सोपविण्यात आले आहे. दोघांचेही डीएनए रिपोर्ट जुळल्यानंतर मुलाला तिच्या ताब्यात देण्यात आले.
समितीचे अध्यक्ष न्यायदंडाधिकारी बाला चतुर्वेदी, सदस्य रचना श्रीवास्तव, राजेश शुक्ला आणि दीपशिखा यांनी शुक्रवारी डीएनए अहवाल आणि रुग्णालयातील नोंदी तपासल्यानंतर नवजात मुलाला त्याचे खरे वडील विक्रम आणि आई नीलम यांच्याकडे सोपवण्याचे आदेश दिले. विक्रम आणि त्याची पत्नी जैदपूरमधील जियानपूरचे रहिवासी आहेत. आदेशाची एक प्रत वडील आणि सरकारी बालगृह (बाल) प्राग नारायण रोड, लखनौ यांनाही देण्यात आली आहे.
पोलिस अधिकार्यांनीही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, महानगर, लखनौ यांना अनेक स्मरणपत्रे पाठवून या प्रकरणातील डीएनए अहवाल लवकरात लवकर देण्याचे आवाहन केले. आदेशाची प्रत मिळताच नवजात बालकाच्या कुटुंबीयांचे चेहरे आनंदाने उजळले. सीडब्ल्यूसी खंडपीठाने आपल्या निकालात असेही निर्देश दिले की नवजात सुमारे 56 दिवस त्याच्या आईच्या प्रेमापासून दूर राहिले. यामुळे नवजात बालकाच्या शारीरिक, मानसिक व भावनिक स्थितीची सीएमएस महिला रुग्णालयाकडून तपासणी करण्यात यावी.
डीएनए अहवालाने रुग्णालय प्रशासनाच्या नोंदीवर शिक्कामोर्तब केले आहे, डीएनए अहवालात जिल्हा महिला रुग्णालयातील एनआयसीयू वॉर्डातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदीवरील तपशिलावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासन पहिल्या दिवसापासून हे बालक नीलम यांचे असल्याचा दावा करत होते. मात्र, आणखी एका नवजात बालकाच्या मृत्यूवरून गदारोळ झाल्याने त्याची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही घटना २७ जुलैची आहे. फतेहपूरच्या बानी रोशनपूर येथील सत्येंद्र वर्मा यांची पत्नी हर्षिता हिने एका मुलाला जन्म दिला. काही अडचणींमुळे आशा वर्कर गीता यांनी मुलाला एनआयसीयूमध्ये दाखल केले. दरम्यान, रात्री ११ वाजता, झैदपूरच्या जियानपूरच्या विक्रमने आपल्या काही तासांच्या नवजात बाळाला बेबी नीलम असा पत्ता नोंदवून एनआयसीयूमध्ये दाखल केले. जिथे एका मुलाचा मृत्यू झाला होता. दोन्ही माता-पित्यांकडून हयात असलेल्या मुलावर आपला हक्क सांगितला जात होता. त्यानंतर पालक आणि मुलाची डीएनए चाचणी करण्यात आली.
हर्षिताचा नवरा डिप्रेशनमध्ये
महिला रुग्णालयाचे डॉ. प्रदीप श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षिताच्या पहिल्या दोन मुलांचा गर्भातच मृत्यू झाला होता. पहिली गर्भधारणा फतेहपूरमध्ये झाली. शहरातील शगुन हॉस्पिटलमध्ये दीड वर्षांपूर्वी गर्भातच बाळ मृत पावले. तिसर्या मुलाच्या मृत्यूनंतर हे जोडपे नैराश्यात गेले. डीएनए चाचणीच्या अहवालाची विचारपूस करण्यासाठी हे दाम्पत्य अनेकदा रुग्णालयात जात होते. दावेदार विक्रम आणि त्याची पत्नी नीलम यांनाही डीएनए चाचणीच्या निकालाची उत्सुकता होती. अखेर सत्य समोर आले आहे.
DNA Test Infant Hand Over to Real Mother
Uttar Pradesh Government Hospital