इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रामगोपाल वर्मा हा दिग्दर्शक म्हणून जेवढे प्रसिद्ध आहेत त्यापेक्षाही जास्त ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते अशाच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ते एका अभिनेत्रीच्या पायांना किस करताना दिसले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली होती. अशातच त्याचा एक जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. यानंतर त्यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट केली होती, ती चर्चेत आली आहे. श्रीदेवी यांच्या सुंदर आणि प्रमाणबद्ध असलेल्या मांड्या हे त्यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचे प्रमुख कारण असल्याचं वर्मा यांनी म्हटल होतं.
दाक्षिणात्य चित्रपटातून बॉलीवूडमध्ये येणारे कलाकार तसे खूप आहेत. मात्र अभिनेत्री श्रीदेवी यांची गोष्टी वेगळीच आहे. श्रीदेवी यांनी बॉलीवूडमधील एक काळ प्रेक्षक आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांचा आवाज, भूमिका, हे विसरणं शक्यच नाही. संसारात रमल्यानंतर त्यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक देखील केलं होतं. जवळपास एका दशक एवढा काळ चित्रपटांपासून दूर असलेल्या श्रीदेवी यांचा पुनरागमनानंतरचा पहिलाच चित्रपट तुफान हिट ठरला. पण त्यावेळी राम गोपाल वर्मा यांनी असं काही विधान केलं होतं की, त्यावर बोनी कपूर आणि राम गोपाल वर्मा यांच्यात जोरदार जुंपली होती. “श्रीदेवी यांना त्यांच्या सुंदर मांड्यांनी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली.” असं ट्वीट त्याने केलं होतं.
“मी श्रीदेवी यांच्या मांड्या, त्यांचं हास्य, त्यांचं अभिनय कौशल्य, संवेदनशीलता आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोनी कपूर यांच्यावर असलेल्या त्यांच्या प्रेमाचा मी आदर करतो. पण जर फक्त अभिनय कौशल्य स्टारडमचं कारण असतं तर मी स्मिता पाटील श्रीदेवी यांच्यापेक्षा मोठ्या कलाकार का नव्हत्या? श्रीदेवी यांच्या मांड्यांमुळे दोघींमध्ये फरक निर्माण झाला.” असे राम गोपाल वर्मा यांनी ट्विटमध्ये म्हंटले होते. राम गोपाल यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. तर बोनी कपूर यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर पुन्हा राम गोपाल वर्माने बोनी कपूर यांना उद्देशून, “बोनी कपूर यांना माझा सल्ला आहे की माझ्यावर राग काढण्यापेक्षा श्रीदेवी यांच्यावर लिहिलेल्या ‘गन्स अँड थाइज’मधील लेख पूर्ण वाचावा.
बोनी कपूर आणि राम गोपाल वर्मा यांच्यात यावरून जोरदार वाद झाला होता. राम गोपाल वर्माने आत्मचरित्र ‘गन्स अँड थाइज’मध्ये दिग्दर्शक बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना एक हाउसवाइफ बनवून ठेवल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली होती. या पुस्तकात त्यांनी विस्ताराने लिहिलं होतं की कशाप्रकारे ते स्वतः श्रीदेवी यांच्या प्रेमात वेडे होते आणि आताही आहे. हेच कारण होतं की बोनी कपूर राम गोपाल वर्मावर भडकले होते. त्यानंतर त्याने स्पष्टीकरण देताना श्रीदेवी यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट केली होती.
दरम्यान, याआधीही बोनी कपूर आणि राम गोपाल वर्मा यांच्यात श्रीदेवी यांच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. राम गोपाल वर्माच्या प्रदर्शित न झालेल्या एका चित्रपटामुळे बोनी कपूर खूप नाराज झाले होते. त्यांनी राम गोपाल वर्माला कायदेशीर नोटीस पाठवली होती.
Director Ram Gopal Varma on Sridevi Controversial Statement