इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संरक्षण मालमत्ता विभागाचे महासंचालक (डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट) म्हणून शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी 31 मे 2025 रोजी पदभार स्वीकारला. 1990 च्या तुकडीचे भारतीय संरक्षण मालमत्ता सेवा अधिकारी असलेले गुप्ता यांना छावणी आणि संरक्षण जमिनीच्या व्यवस्थापनाचा दीर्घ आणि उल्लेखनीय अनुभव आहे.
या नियुक्तीपूर्वी त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. यामध्ये विविध छावणी मंडळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), विविध मंडळांचे संरक्षण मालमत्ता अधिकारी (डीईओ), संचालक संरक्षण मालमत्ता, मध्य कमान, तसेच प्रमुख संचालक, संरक्षण मालमत्ता, पूर्व कमान यांचा समावेश आहे.
संरक्षण मालमत्ता महासंचालनालय देशभरातील सुमारे 18 लाख एकर संरक्षण जमिनीचे व्यवस्थापन व देखभाल करण्यासाठी जबाबदार आहे. हा विभाग सहा कमान, 38 संरक्षण मालमत्ता मंडळे आणि 61 छावणी मंडळांमार्फत कार्यरत आहे.