मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोणला प्रकृती खालावल्याने तिला मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारानंतर प्रकृती सुधारल्यामुळे तिला डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयात तिच्या काही टेस्टदेखील करण्यात आल्या आहेत.
जून महिन्यात शूटिंग सुरू असताना दीपिकाची प्रकृती खालावली होती. त्यावेळीदेखील तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीपिकाचे पठाण, फायटर, प्रोजेक्ट हे आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ती सध्या चांगलीच बिझी आहे. त्यातच तीची प्रकृती खालावली, पण, उपचारानंतर तिला डिस्चार्ज मिळाला आहे.