दिंडोरी – शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी दिंडोरी शहरात प्रशासनाने सतर्क होत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. व्यापाऱ्यांचेही प्रबोधन करत ग्राहकांना नो मास्क नो वक्सिन नो एंट्री करण्याचे आवाहन केले आहे.
दिंडोरी नगरपंचायत प्रशासन व पोलीस ठाण्याचे वतीने शहरात रुट मार्च काढत व्यापारी व नागरिकांचे प्रबोधन केले. व्यापारी बांधवांना ज्यांचे दोन डोस झाले असेल त्यांनीच दुकानात थांबावे दर्शनी भागात डोस सर्टिफिकट लावावे. ग्राहकांना ही मास्क शिवाय तसेच डोस घेतला असल्याशिवाय प्रवेश देवू नये. तसेच गर्दी होवू देवू नये. मास्क अनिवार्य करावे आदी बाबत प्रबोधन करण्यात आले नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे सूतोवाच करण्यात आले. तसेच बीना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सुमारे पाच हजार दंड वसूल करण्यात आला. कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांनी सर्व नियम पाळावे बाजारपेठेत गर्दी करू नये असे आवाहन नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले,पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले आहे.