धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सामजिक कार्यकर्ते व पाष्टे येथील एस.सी. वाणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर श्रावण सोनजे यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. केंद्रीय सूक्ष्म व लघु मंत्रालया अंतर्गत करणाऱ्या औद्योगिक विकास कार्पोरेशन कार्य करते. याच कॉर्पोरेशनची नोडल एजन्सी म्हणून औद्योगिक विकास कार्पोरेशनच्या निडको (Nidko) कार्यरत आहे. याच निडकोच्या धुळे जिल्हा सल्लागारपदी सोनजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देशातील बेरोजगार, लघु, मध्यम, उद्योग, व्यवसाय, बाजारपेठ, बचत गट व लघु उद्योगांना राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून सक्षम करण्याचे कार्य निडकोमार्फत केले जाते. मुद्रा लोन, स्टॅन्ड अप इंडिया, लोन नवउद्योजकांना शासकीय अनुदान मिळवून देण्याचे कार्य करते. त्यामुळे सोनजे हे आता धुळे जिल्ह्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावणार आहेत. सोनजे यांना नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष एस. के .सिंग यांनी दिले आहे. या निवडीबद्दल निडकोचे महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक विनोदजी ससाणे यांनी अभिनंदन केले आहे.
उत्तम बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्य निडको करते. देशात रोजगार व उद्योग वाढवणे महिला बचत गट वाढवणे शेतकरी गट त्यांना आत्मनिर्भर बनविणे यात निडकोचा वाटा मोलाचा आहे. मुद्रा लोन क्लस्टर, उद्योग, स्टार्टअप इंडिया लोन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती अशा योजनांद्वारे उद्योजक व व्यावसायिकांसाठी अहोरात्र करणार असल्याचे सोनजे यांनी म्हटले आहे. या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.