India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘माझ्या मागे गुंड लागले आहेत’, असा मेसेज केल्यानंतर दोन तासातच आढळला तापी नदीत मृतदेह

India Darpan by India Darpan
June 5, 2023
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बाळदे येथील महावितरण उपकेंद्र कार्यालयातील सीनिअर ऑपरेटरचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक मेसेज पाठवला होता. माझ्या मागे गुंड लागले आहेत, काय करु सुचत नाही” असे त्याल लिहिले होते. त्यानंतर दोन तासात त्यांचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आला.

प्रवीण विजय गवते (वय ४२ वर्षे, रा.चिमठाणे ता. शिंदखेडा) हे सीनिअर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांची दुचाकी गिधाडे तापी नदीपुलावर बेवारस स्थितीत आढळून आली होती. प्रवीण गवते यांची रात्रपाळी असल्याने ते रात्रीपासून बाळदे इथल्या सबस्टेशनवर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी चिमठाणे इथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र दुपारी साधारणतः ३ वाजता त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज टाकला. या मेसेजनंतर लगेच दोन तासांनी सांयकाळी ५ वाजता त्यांचा मृतदेह तापी नदीत आढळला.

विशेष म्हणजे प्रवीण गवते यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं की, “माझ्या मागे ५ गुंड मुलं लागली असून ती सर्व अनोळखी आहेत. मला काहीच सुचत नाही. माझ्यासोबत तीन लाख रुपये आहेत, मी कसा तरी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असून मला मदत करा. ग्रुपमधील मेसेज वाचून त्यांना संपर्क देखील साधण्यात आला होता. मात्र यानंतर त्यांची दुचाकी गिधाडे तापी पुलावर आढळून आली होती. त्यांचा गिधाडे तापी नदीपात्रात शोध सुरु केला असता साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास प्रवीण गवते यांचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आला. त्यांचा मृतदेह शिंदखेडा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

आता प्रवीण गवते यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजमुळे अनेक अंदाज लावण्यात येत आहेत. प्रवीण गवते यांच्या मागे लागलेले गुंड कुठे गेले? त्यांनी आत्महत्या केली की स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात चुकून नदीपात्रात उडी मारली. याशिवाय आपल्याकडे तीन लाख रुपये असल्याचे त्यांनी मेसेजमध्ये लिहिले होते मग ते पैसे कुठे आता आहेत, असे अनेक सवाल उभे राहीले आहेत. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याच्या जीवाला जर असा धोका होत असेल, तर त्याने काम कसे करावे ? अशी ही चर्चा परिसरात सुरू होत आहे.

Dhule Crime MSEDCL Employee Death Murder


Previous Post

पुणे-नाशिक औद्योगिक कॉरिडॉरसाठी हालचाली गतिमान; MSRDCने घेतला हा निर्णय

Next Post

बापलेकाने आधी पैसे घेतले… फ्लॅट तर दिलाच नाही… परस्पर तिसऱ्याला विकला… असे झाले उघड

Next Post

बापलेकाने आधी पैसे घेतले... फ्लॅट तर दिलाच नाही... परस्पर तिसऱ्याला विकला... असे झाले उघड

ताज्या बातम्या

सिडकोत एकाला इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध पडला महागात, साडे अठरा लाखाला गंडा

September 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पैशांसाठी मुलाने आईवर प्राणघातक हल्ला, आई गंभीर जखमी

September 29, 2023
crime

वाहनचोरीची मालिका सुरू; वेगवेगळ्या भागातून चार मोटरसायकली चोरीला

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

रस्त्याने पायी जाणा-या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग, तीन जणांवर गुन्हा दाखल

September 29, 2023

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये आत्मघाती बॅाम्बस्फोटात ५२ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी

September 29, 2023

राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट… तब्बल १३ जणांचा मृत्यू…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group