महेश शिरोरे
देवळा – तालुक्यातील कनकापूर ,मेशी ,भऊर ,मटाने ,सटवाईवाडी ,माळवाडी ,गिरणारे व तिसगांव या आठ गावातील ग्रामपंचातींच्या अकरा रिक्त जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत चार उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत दोन ठिकाणी निवडणूक होणार आहे. तर उर्वरित जागांसाठी अर्ज प्राप्त न झाल्याने पदे रिक्त राहणार आहेत. बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे – कनकापूर ग्रामपंचायत- बायजाबाई दिनकर शिंदे ( सर्वसाधारण महिला ) ,माळवाडी ग्रामपंचायत – मछिंद्र बबन आहिरे (अनु . जाती ),सटवाईवाडी ग्रामपंचायत -प्रदीप रामराव आहेर (सर्वसाधारण ),भऊर ग्रामपंचायत -श्रावण विठ्ठल पवार (सर्वसाधारण ) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर कनकापूर तीन ,मटाने एक या रिक्त जागांवर अर्ज प्राप्त न झाल्याने हि पदे रिक्त आहेत. उर्वरित तिसगांव अनु जमाती महिला राखीव आणि मेशी येथे सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. अशी माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली.