India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भऊर-खामखेडा पूल आमदार राहुल आहेरांच्या मध्यस्थीने होणार वाहतुकीसाठी खुला

India Darpan by India Darpan
September 8, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  वादाच्या भोवऱ्यात अडकलेला भऊर-खामखेडा गावांना जोडणारा गिरणा नदीवरील पुल आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मध्यस्तीने वाहतुकीसाठी तूर्तास खुला होणार असल्याने भऊर-खामखेडा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. भऊर-खामखेडा पुलाचे काम पूर्ण होऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र भऊर गावाकडून पुलाकडे जाण्याचा रस्ता हा पोपट दौलत पवार, किशोर रामभाऊ पवार, अरुण राजाराम पवार, लक्ष्मण राजाराम पवार यांच्या खाजगी क्षेत्रातून जात असून संबंधित शेतकऱ्यांना त्या क्षेत्राबद्दल कुठलाही मोबदला अद्याप मिळालेला नाही. यामुळे संबंधित शेतकरी यांनी हरकत घेत हा रस्ता पूर्ण करण्यास विरोध दर्शविला आहे.

सद्यस्थितीत संबंधित क्षेत्राचे मोजमाप झाले असून, उपविभागीय अधिकारी चांदवड यांच्या मार्फत नगररचना विभाग नाशिक यांच्याकडे भूसंपादन जमीनेचे मूल्यांकन कामी पाठविण्यात आला आहे. यानंतर निधी मंजुरी, संबंधितांच्या खाती मोबदला वर्ग होणे यासाठी देखील काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. संबंधित दोन्ही गाव व परिसरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता आमदार डॉ. राहुल आहेर यांनी संबंधित शेतकरी व अधिकारी यांची बैठक घेतली.

आमदार आहेर यांच्या माध्यस्तीने संबंधित शेतकरी यांनी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता मनाचा मोठेपणा दाखवत तात्पुरता कच्चा रस्ता करण्यास परवानगी दिली. शेतकरी वर्गाने आपल्या शब्दाला मान देऊन काही महिन्यांसाठी रस्ता तात्पुरत्या स्वरूपात रस्ता खुला करण्यास परवानगी दिली असून लवकरात लवकर दिलेल्या अवधीत संबंधित शेतकरी यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी अधिकारी वर्गाला सूचना दिल्या असल्याचे आ. आहेर यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस सरपंच दादा मोरे, तंटा मुक्ती अध्यक्ष नितीन पवार, बाबा पवार, पोपट पवार, किशोर पवार, लक्षण पवार अरुण पवार, अँड. लक्षण पवार खामखेडा येथील संजय(नाना) मोरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय मोरे, जगदीश शेवाळे. आदी उपस्थित होते.

Deola Bhaur Khamkheda Bridge will Open Soon
Rural


Previous Post

शिक्षकांच्या फोटोसंदर्भात अखेर शिक्षण विभागाने घेतला हा निर्णय

Next Post

नेताजींच्या पुतळ्याचे आज मोदींच्या हस्ते अनावरण; पण, नेताजींचे कुटुंबिय राहणार गैरहजर

Next Post

नेताजींच्या पुतळ्याचे आज मोदींच्या हस्ते अनावरण; पण, नेताजींचे कुटुंबिय राहणार गैरहजर

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group